श्रीहरीकाका गोसावी भागवत मठ, हत्तरगी येथे गोकुळ अष्टमी उत्साहात* आंतरराज्य भजन सम्राट स्पर्धेत खोची माऊली भजनी मंडळ विजेता, बेटगिरीचा सातेरीदेवी उपविजेता

श्रीहरीकाका गोसावी भागवत मठ, हत्तरगी येथे गोकुळ अष्टमी उत्साहात*
आंतरराज्य भजन सम्राट स्पर्धेत खोची माऊली भजनी मंडळ विजेता, बेटगिरीचा सातेरीदेवी उपविजेता
सिंहवाणी ब्युरो / गडहिंग्लज
हत्तरगी येथील पुरातन श्रीहरीकाका गोसावी ऋग्वेदी भागवत मठाच्या वतीने गोकुळ अष्टमीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आंतरराज्य भजन सम्राट स्पर्धेत प्रथम क्रमांक खोची येथील माउली भजनी मंडळाने अकरा हजार रुपये प्रमाण पत्र, सन्मानचिन्ह पटकाविले. सातेरीदेवी भजनी मंडळ, बेटगिरी ता.खानापुर . बेळगाव या संघाने रुपये सात हजार, प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह द्वितीय क्रमांक पटकाविला तर तृतीय क्रमांक संत तुकाराम महाराज भजनी मंडळ माणगाव ता. चंदगड या संघाने रुपये पाच हजार, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र मिळविले. दहीहंडी व गोपाळ काला वेणुगोपाळ गोसावी यांच्या हस्ते संपन्न झाला.
स्पर्धेचा इतर निकाल असा –
*उत्तेजनार्थ* –
१) रवळनाथ भजनी मंडळ, अडकूर , ता. चंदगड
रक्कम रु.३००१/-
२) गुरुमाऊली भजनी मंडळ, गोरंबे, ता. कागल
रक्कम रु. ३००१/-
३) श्रीहरि संगीत कला मंच कल्लेहोळ, ता. चिकोडी
पारितोषिक रक्कम रु. ३००१/-
४) श्री स्वामी समर्थभजनी मंडळ किनये, ता. बेळगाव
पारितोषिक रक्कम रु. ३००१/- उत्कृष्ट
५) मुक्त ग्रुप महिला भजनी मंडळ, बेळगाव
पारितोषिक रक्कम रु.३००१
*वैयक्तिक बक्षिसे* –
१) उत्कृष्ट गायक – कौस्तुभ संतोष सुतार ,श्री गुरुदेव भजन सेवा मंडळ, गडहिंग्लज
२ )उत्कृष्ट गायिका – ऐश्वर्या मंगेश होसुरकर, श्री ज्ञानेश्वर महिला भजन मंडळ,राजवाडा कंपाऊंड, वडगाव,बेळगाव.
३) तबलावादक – कु. चेतन विष्णू सुतार, गुरुमाऊली भजनी मंडळ, गोरंबे
४) पखवाजवादक – विनायक शंकर मुतकेकर ,स्वामी समर्थ भजनी मंडळ किनये – बेळगांव
५) हार्मोनियम वादक- कु.सृष्टी शंकर पाटील श्रीहरी संगीत , कल्लेहोळ, ता. चिकोडी
भजन सम्राट स्पर्धेतील विजेत्या संघांना पीठाधीश डॉआनंद गोसावी यांच्या हस्ते बक्षीसांचे वितरण करण्यात आले.
गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त विविध आध्यात्मिक, संगीत सेवा कार्यक्रम संपन्न झाले. . स्वरदा पटवर्धन (मिरज) यांचे नारदीय कीर्तन संपन्न झाले. शास्त्रीय संगीत आणि गायन सेवा अभिषेक काळे सांगली; प्रसन्न गुडी धारवाड, अनुराधा कुबेर पुणे यांनी सादर केले.
स्पर्धेत १६ संघानी सहभाग घेतला होता . भजन स्पर्धेचे परीक्षण सुरेश सरदेसाई, अजित तोडकर , कीर्ती सरदेसाई, नंदकुमार माळी यांनी केले.
प्रास्ताविक डॉ. प्रा. सुनील देसाई यांनी केले. आभार प्रा. विश्वंभर कुलकर्णी यांनी मानले. उत्सवात माजी आम . बजरंग देसाई; धैर्यशील देसाई, डॉ.अनिल कुराडे, ॲड.दिग्विजय कुराडे , ॲड. एस.एम.कुलकर्णी ,रविंद्र जिनराळे , माजी आम . राजेश पाटील, सुस्मिता पाटील, दत्ताजी उगले, आर. डी. देसाई यांच्यासह सीमा भागातील हरीभक्त आणि मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते