शासनाकडून धार्मिक स्थळ विकासासाठी भरमसाठ निधी पण धार्मिक स्थळावरील ठेकेदारांची अरेरावी ची वागणूक.चहा पेक्षा किटली गरम.

शासनाकडून धार्मिक स्थळ विकासासाठी भरमसाठ निधी पण
धार्मिक स्थळावरील ठेकेदारांची अरेरावी ची वागणूक.चहा पेक्षा किटली गरम.
सिंहवाणी ब्युरो /शैलेंद्र उळेगड्डी, कडगाव:
महाराष्ट्रातील प्रसिद्ध मंदिराच्या ठिकाणी स्वछता, सुरक्षितता व पार्किंग यासाठी नेमणूकिस असणारे खाजगी ठेकेदार कंपनीचे कर्मचारी तर काही धार्मिक स्थळावरील देवस्थानाचे कर्मचारी यांच्याकडून भाविकांना मिळणारी अरेरावीची वागणूक ही निंदनीय बाब असून बऱ्याच ठिकाणी भाविकांना संतापजनक वागणुकीला सामोरे जावे लागते. या तुन बऱ्याच वेळा वादविवाद होत आहेत. शासनकडून धार्मिक स्थळानंच्या विकासासाठी भरमसाठ निधी दिला जातो पण याच धार्मिक स्थळावर व्यवस्थिपणा साठी असणाऱ्या मुजोर कर्मचार्यांच्या वागणुकीमुळे ‘चहा पेक्षा किटली गरम’ अशी अवस्था झाली आहे.
श्रावण महिन्यात सर्वच मंदिरामध्ये श्रद्धाळुंची गर्दी होत असते.सर्वच देवालयामध्ये श्रद्धाळू गर्दी करत आहेत. महाराष्ट्रातील बऱ्याच मंदिरामध्ये खाजगी तर काही ठिकाणी देवस्थान कमिटी ने स्वतःचे कर्मचारी व्यवस्थापनासाठी नेमले आहेत.अपवाद वगळता काही ठिकाणी कर्मचारी हे वयोवृद्ध भाविकांशी असभ्य वर्तन करतात,अरेरावी करणे तर यांचा जणू हक्कच आहे अशा अवीर्भात हे वावरत असतात. पुरुष व महिला असे सर्वच कर्मचारी हे भाविकांशी आपुलकीने वागताना दिसत नाहीत. यांच्या बाबत तक्रार करण्यासाठी कुठेही तक्रार बुक उपलब्ध नाहीत. एखाद्या वरिष्टाकडे तक्रार करण्यासाठी वरिष्टांचा मोबाईल नंबर ची देखील धार्मिक स्थळी नोंद सापडत नाहीत.
महाराष्ट्रातील गरिबांचा देव म्हणून परिचित असणाऱ्या एका धार्मिक स्थळवरील भक्त निवसाच्या देखभाल व व्यस्थापनाची जबाबदारी देशातील एका नामांकित कंपनी कडे देण्यात आली आहे. या ठिकाणी भक्त निवासतील रूम बुक केल्यानंतर कोणत्याही अडचणी करिता कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता अत्यन्त वाईट वागणूक दिली जाते, प्रचंड अरेरावी व धमकावण्यापर्यंत या कर्मचाऱ्यांची मजल जाते अशी तक्रार भाविकातून व्यक्त होतं आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत व साडेतीन शक्ती पिठा पैकी एक व छत्रपती शिवरायांचे आराध्य दैवत असणाऱ्या ठिकाणी देखील पार्किंग चे पैसे गोळा करणार्यांकडून नियमित अरेरावीची वागणूक मिळत असते तसेच या ठिकाणी अस्वछ पार्किंग, घाणीचे साम्राज्य असल्याची खंत भाविकातून व्यक्त होत आहे.
श्रावण महिण्यासाह सर्वच महिन्यामध्ये सध्या भाविकांची धार्मिक स्थळावर गर्दी होत असते. कर्मचाऱ्याच्या अशा बेशिस्त वर्तनमुळे परराज्यातून येणाऱ्या भाविकांची संख्या रोडावण्याची शक्यता आहे.
राज्य सरकार राज्यातील धार्मिक स्थळच्या विकासासाठी भरमसाठ खर्च करीत आहे पण तेथील व्यवस्थापनाच्या वागणुकीमुळे ‘चहा पेक्षा किटली गरम’ अशी अवस्था झाल्याची चर्चा व तक्रार भाविकातून व्यक्त होत आहे