तासगाव अर्बन बँकेचा 410 कोटी व्यवसाय पूर्ण, : सभा खेळीमेळीत संपन्न,

तासगाव अर्बन बँकेचा 410 कोटी व्यवसाय पूर्ण, : सभा खेळीमेळीत संपन्न,
सिंहवाणी ब्युरो / तासगाव
सांगली जिल्ह्यातील उत्कृष्ट बैंक म्हणून नावारुपास आलेली दि तासगांव अर्बन को-ऑप. बँक लि., तासगांवची ९० वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात कोहीनूर मल्टी पर्पज हॉल, तासगांव येथे पार पडली.सभेच्या सुरुवातीस उपस्थित सर्व सन्माननीय सभासद बंधू व भगीनींचे स्वागत बँकेचे व्हा. चेअरमन कुमार शेटे यांनी केले. बँकेचे सभासद, ठेवीदार, कर्जदार व हितचिंतक यांच्या सहकार्यामुळे बँकेची प्रगती सुरु आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे बँकेस पुणे विभागातून दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन कडून सलग दुसऱ्या वर्षीही पद्मभुषण कै. वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक या पुरस्काराने सन्मानीत करणेत आलेले आहे. बँकेने आपल्या ४१० कोटी व्यवसायाचा टप्पा पुर्ण केलेला असून लवकरच बँकेचा एकूण व्यावसाय ५०० कोटी पर्यंत नेणेचा बँकेचा मानस आहे. बँकेच्या सभासदांनी आपले सर्व बँकिंग व्यवहार हे आपल्या बँकेमार्फतच करावेत. आपल्या बँकेमध्ये जास्तीत जास्त ठेव ठेवून सहकार्य करावे असे सभेमध्ये आवाहन केले.आले. सभेचे प्रास्तावीक संचालक विनय शेटे यांनी केले. व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन केले,तद्नंतर अहवाल सालात दिवंगत झालेल्या थोर राजकीय नेते, संशोधक, शास्त्रज्ञ, लेखक, साहित्यिक, कलाकार, खेळाडू तसेच सीमेवरील शहीद जवान यांना श्रद्धांजली वाहनेबाबतचा ठराव संचालक राजेंद्र माळी यांनी मांडला. त्यानंतर दोन मिनिटे स्तब्ध उभे राहुन श्रध्दांजली वाहनेत आली. अध्यक्ष महेश्वर हिंगमिरे यांनी सभेमध्ये आपले मनोगत व्यक्त करताना सांगीतले की, आपली बँक ही सर्व सभासद बंधू भगीनी यांच्या सहकार्याने रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सुचनांनुसार पारदर्शक कारभार करुन बँकेची उत्तरोत्तर प्रगती साधलेली आहे. मागील आर्थिक वर्षामध्ये आपले बँकेने विटा, पंढरपूर व सोलापूर येथे नवीन तीन शाखा उघडलेल्या आहेत. पुढील काळामध्ये सातारा व कोल्हापूर या जिल्हयामध्येही बँकेच्या शाखा उघडणेचा संचालक मंडळाचा मानस आहे. सन २०१५-१६ या आर्थिक वर्षामध्ये महाराष्ट्र बैंक्स असोसिएशन तर्फे आपले बँकेस उत्कृष्ट बैंक पुरस्कार मिळालेला होता. सभासदांना सांगणेस आनंद होत आहे की, सन २०२२-२३ व सन २०२३-२४ या सलग दोन
वर्षामध्ये महाराष्ट्र बैंक्स असोसिएशन कडून बँकेस पुणे विभागातील उत्कृष्ट बैंक या पुरस्काराने सन्मानित करणेत आलेले आहे. ज्या सभासदांचे शेअर्स १० किंवा १०० रुपयाचे आहेत त्यांनी आपली शेअर्स रक्कम पुर्ण करुन घ्यावी असे सांगीतले. प्रत्येक वर्षी आपण सभासदांना १२ टक्के प्रमाणे डिव्हीडंड देत आलो आहोत. मागील वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांच्या मागणीनुसार चालू आर्थिक वर्षामध्ये चेअरमन यांनी सभासदांना १३ टक्के डिव्हिडंड जाहिर केला.. मुख्य कार्यकारी अधिकारी . श्रीकांत कुलकर्णी यांनी सभेपुढील विषयांचे वाचन केले. सर्व विषयांवर सभेमध्ये चर्चा झाली. सभासदांनी सर्व विषयांना एकमताने मान्यता दिली. बँकेचे सभासद भोसले साहेब यांनी बँकेच्या चांगल्या कामाबाबत व महाराष्ट्र बैंक असोसिएशन कडुन बँकेस मिळालेल्या पुरस्काराबाबत संचालक मंडळ व कर्मचारी वर्ग यांचे अभिनंदन केले.तासगांव तालुक्यामध्ये शालांत परिक्षेमध्ये ९५ टक्के पेक्षा जास्त गुणांनी उत्तिर्ण झालेल्या अशा ९ गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांतर्फे सत्कार करणेत आला. ज्या सभासदांनी आपल्या वयाची ७१ वर्षे पुर्ण केलेली आहेत अशा सर्व सभासदांचा यथोचित सत्कार करणेत आला.सभेमध्ये झालेल्या चर्चेत सभासदांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला. त्यानंतर बँकेचे संचालक विनय शेटे यांनी उपस्थित सर्व सभासद बंधू भगीनिंचे आभार मानले. अशा पध्दतीने बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.यावेळी बँकेचे सर्व सभासद,व चेअमन महेश्वर हिंगमिरे, व्हा. चेअरमन कुमार शेटे, संचालक . अरुण पाटील, बंडू शेटे. विनय शेटे, अनिल कुत्ते, उदय वाटकर, धोंडीराम सावंत, . राजेंद्र माळी, सौरभ हिंगमिरे, उदय डफळापूरकर, आशिष अडगळे, श्रीमती सविता पैलवान, . उमा हिंगमिरे, व्यवस्थापन मंडळ सदस्य अवधूत गडकर, रविंद्र देवधर, प्रदिप पवार बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री श्रीकांत कुलकर्णी, असि. जनरल मॅनेजर नारायण सगरे व विनायक मेंडगुले,प्रवीण महिंद सर्व स्टाफ व इतर मान्यवर उपस्थित होते.