शालार्थ आयडी चौकशी : राज्यातील 680 शिक्षकांना अटक होणार❓ बोगस शिक्षकांचे धाबे दणाणले

शालार्थ आयडी चौकशी
राज्यातील 680 शिक्षकांना अटक होणार❓ बोगस शिक्षकांचे धाबे दणाणले
सिंहवाणी वेब टीम
: राज्यातील 680 शिक्षकांना अटक होण्याची शक्यता आहे… कारण एसआयटीच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड झालीय.. मात्र साम टीव्हीनं सातत्याने पाठपुरावा केलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याची मोडस ऑपरेंडी कशी आहे? आणि किती बोगस शिक्षक आढळून आलेत?
एका वृत्त वाहिनीने उघड केलेल्या बोगस शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणाच्या एसआयटी चौकशीत धक्कादायक माहिती समोर आलीय.. सायबर पोलिसांनी तपासलेल्या 1 हजार 80 पैकी 680 शिक्षकांचे शालार्थ आयडी बोगस असल्याचं आढळून आलंय…त्यामुळे सर्वच बोगस शिक्षकांवर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात येणार असल्याचे संकेत सरकारने दिलेत.. त्यामुळे बोगस शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत…
सरकारने बोगस शालार्थ आयडी बनवलेल्या शिक्षकांना अटक करण्याचे संकेत दिले असले तरी हा घोटाळा कसा उघड झाला? त्याची मोडस ऑपरेंडीच या टीव्हीने उघड केलीय…नागपूरचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांच्या समितीने 233 शिक्षकांचे शालार्थ आयडी बोगस असल्याचा अहवाल दिला….त्याआधारेच 12 मार्चला सायबर पोलिसांकडे पहिला गुन्हा दाखल झाला.. आणि चौकशीचं चक्रं फिरायला सुरुवात झाली..या प्रकरणात एसआयटीने निलेश वाघमारेला अटक केलीय… आणि एसआयटीने आणखी चौकशी केली.. यात सायबर पोलिसांनी 1 हजार 80 शालार्थ आयडींची तपासणी केली.. त्यापैकी तब्बल 680 शालार्थ आयडी बोगस असल्याचं आढळून आलंय.. या प्रकरणी आतापर्यंत शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आलीय.. मात्र माजी शिक्षण उपसंचालक सतीश मेंढे अजूनही फरार आहे…
हा घोटाळा फक्त नागपूर विभागापुरताच मर्यादित नाही… तर या घोटाळ्यानं अख्ख्या महाराष्ट्राला पोखरलंय… त्यामुळे फक्त 1 हजार 80 शालार्थ आयडीपैकी 680 बोगस आयडी आढळले असतील तर राज्यभरात शालार्थ आयडीच्या माध्यमातून किती बोगस शिक्षक असतील? याची कल्पनाच न केलेली बरी… त्यामुळे राज्यातील शिक्षण विभागातील बोगसगिरीचा पर्दाफाश होईपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा करुन बोगस शिक्षण खात्याची पोलखोल करत राहणार, हे मात्र निश्चित.
चौकशीची प्रमुख कारणे:
शिक्षण विभागातील शालार्थ प्रणालीमध्ये अपात्र आणि बोगस कर्मचाऱ्यांची नावे समाविष्ट करून गैरव्यवहार करणे.
कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला असून, त्यात संबंधित अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे दिसून आले आहे.
या घोटाळ्यामुळे राज्याच्या शिक्षण क्षेत्रातील कार्यप्रणालीची पोलखोल झाली आहे.
सद्यस्थिती:
राज्य शासनाने या प्रकरणाच्या तपासासाठी पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात एक विशेष चौकशी पथक (SIT) गठीत केले आहे.
या पथकात कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार शर्मा आणि पुणे शिक्षण आयुक्तालयाचे सहसंचालक हारुण आतार यांचा समावेश आहे.
नागपूर सायबर पोलिसांनी या प्रकरणी काही बड्या अधिकाऱ्यांना अटक केली असून, ही कारवाई सुरूच आहे.
या प्रकरणी आतापर्यंत १२ लोकांना अटक झाली असून, पुढील तपास सुरू आहे