राज्यातील सी.एच.बी.प्राध्यापकांचे वेतन प्रस्ताव रखडले : ऐन सणासुदीत सीएचबी उपाशी, गणेश चतुर्थी नंतर येवू घातलेल्या दसरा-दिवाळी सणांवरही किंक्रात ❓

राज्यातील सी.एच.बी.प्राध्यापकांचे वेतन प्रस्ताव रखडले : ऐन सणासुदीत सीएचबी उपाशी,
गणेश चतुर्थी नंतर येवू घातलेल्या दसरा-दिवाळी सणांवरही किंक्रात ❓
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
यंदा शैक्षणिक वर्ष २०२५- २६ मधील राज्यातील सर्वच शिक्षण सहसंचालक कार्यालयातून सी.एच.बी. प्राध्यापकांचे वेतन प्रस्ताव रखडले असून सणासुदीच्या काळात सी. एच.बी. प्राध्यापकांवर उपासमारीची वेळ आली आहे. गणेश चतुर्थी सण चालू असताना यंदा सी.एच.बी. प्राध्यापक पगारापासून वंचित राहिला आहे. तसेच आता येवू घातलेल्या दसरा दिवाळी सणांवरही किंक्रात ओढवणार की काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
*शिक्षण सहसंचालक कार्यालयांनी ताबडतोब वेतन शिबीराचेआयोजन करावे, कोल्हापूर विभागांतर्गत २२०० सी.एच.बी. कार्यरत-*
कोल्हापूर सह राज्यातील सर्वच उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयानी येत्या दोन दिवसात वेतन मागणी शिबिराचे आयोजन करून तात्काळ गणेश विसर्जनापूर्वी सीएचबी प्राध्यापकांची वेतन अदा करावे अशी मागणी जोर धरत आहे. ज्या विद्यापीठाने अथवा महाविद्यालयाने सीचबी प्राध्यापक प्रस्ताव मंजुरी देणे अथवा पाठविणे टाळाटाळ केलेस शिक्षण विभागाने तात्काळ कार्यवाही करण्याची मागणीही जोर धरत आहे.
###
*” सी. एच. बी. प्राध्यापक वेतन तात्काळ न मिळाल्यास कोल्हापूर सह राज्यातील सर्व शिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर उपोषण आंदोलन छेडण्यात येईल. राज्यातील सर्व महाविद्यालयांची मदार सीएचबी प्राध्यापकांच्यावर असताना तोच उपाशी असेल तर ज्ञानदान कसे होईल ? ह्याचा शासनाने गंभीर विचार करून उच्च तंत्रशिक्षण विभागा कडून सर्व सहसंचालक कार्यालयांना तात्काळ आदेश द्यावेत.”
प्रा. जोतीराम सोरटे
समन्वयक, नेट सेट पीएचडी धारक संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य.