ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सिंहवाणी लाईव्ह न्यूज’ Impact कोल्हापूर शिक्षण सहसंचालक डॉ. प्रकाश बच्छाव व मंत्री चंद्रकांत दादा यांचे विद्यापीठे व महाविद्यालयांना तात्काळ वेतन अदा करणेचे आदेश*

सिंहवाणी लाईव्ह न्यूज’ Impact
कोल्हापूर शिक्षण सहसंचालक डॉ. प्रकाश बच्छाव व मंत्री चंद्रकांत दादा यांचे विद्यापीठे व महाविद्यालयांना तात्काळ वेतन अदा करणेचे आदेश*
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
कालच’ सिंहवाणी लाईव्ह न्यूज’ चॅनेलने सी.एच.बी. प्राध्यापक मंजूरी व वेतन ह्या संदर्भात ‘ सी.एच. बी.प्राध्यापकांचे वेतन प्रस्ताव रखडले ‘ ऐन सणासुदीत त सीएचबी उपाशी’ असे वृत्त प्रसारित केले होते. त्याचा परिणाम म्हणून कोल्हापूर विभागीय सहसंचालक डॉ. प्रकाश बच्छाव यांनी या वृत्ताची दखल घेवून ३ व ४ सप्टेंबर पर्यंत सर्व प्रस्ताव मंजूरी व वेतन कॅम्प आयोजित करणेचे आदेश दिले आहेत. तसेच ना. चंद्रकांत दादा पाटील यांनीही तात्काळ आदेश दिले आहेत. त्याचाच भाग म्हणून शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर यांनीही सर्व विभागांना आदेश दिले आहेत. सी.एच.बी. प्राध्यापकांना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

