गारगोटी- किल्ले भुदरगड एस.टी.बस पाल,बारवे व्हाया मुरुक्टे मार्गे सोडण्यात यावी : मागणी

गारगोटी- किल्ले भुदरगड एस.टी.बस पाल,बारवे व्हाया मुरुक्टे मार्गे सोडण्यात यावी : मागणी
सिंहवाणी ब्युरो / पिंपळगाव
गारगोटी- किल्ले भुदरगड एस.टी.बस पाल,बारवे व्हाया मुरुक्टे मार्गे सोडण्यात यावी अशी मागणी आनंदी महिला ग्रामसंघ मुरुक्टे, ग्रामपंचायत मुरुक्टे यांच्या मार्फत गारगोटी एस.टी.आगार प्रमुखांच्याकडे वारांवार केली आहे. मात्र गेले वर्षभर गारगोटी आगाराने या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे.कोरोना कालावधी नंतर ही बससेवा बंद झाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. मुरुक्टे गावातील प्रवाशांना ही गारगोटी – किल्ले भुदरगड बससेवा अत्यंत गरजेची आहे. चाळीस वर्षे सलग सुरु असलेली बसफेरी तात्काळ सुरु करावी अशी मागणी उमेद अभियान आनंदी महिला ग्रामसंघाने ,मुरुक्टे ग्रामपंचायतीने केली आहे.मागणीचे निवेदन आगार प्रमुख अनिकेत चौगले यांना दोन वेळा देण्यात आले. मात्र ही मागणी आद्यापी पूर्ण झालेली नाही.किल्ले भुदरगड बससेवा व्हाया पाल ,बारवे,मुरुक्टे मार्गे लवकरच सुरु व्हावी या मागणीसाठी येथील ग्रामस्थ पालकमंत्री प्रकाशराव आबिटकर यांना भेटून मागणीचे निवेदन देणार असल्याचे येथिल ग्रामस्थांनी सांगितले .