कडगाव,पाटगाव विभागातील सकल मराठा समाजाच्या मुंबई मराठा आरक्षण आंदोलनास पाठिंबा : कडगाव येथे सोमवारी रॅली चे नियोजन

कडगाव,पाटगाव विभागातील सकल मराठा समाजाच्या मुंबई मराठा आरक्षण आंदोलनास पाठिंबा :
कडगाव येथे सोमवारी रॅली चे नियोजन
सिंहवाणी ब्युरो / शैलेंद्र उळेगड्डी, कडगाव
भुदरगड तालुक्यातील कडगाव,पाटगाव विभागातील सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे यांच्या मुंबई येथील मराठा आरक्षण आंदोलनाना पाठिंबा म्हणून कडगाव येथे सोमवारी रॅली चे नियोजन करण्यात आले आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या करिता मुंबई येथे मनोज जरांगे यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कडगाव पाटगाव विभागातील मराठा समाजाच्या वतीने कडगाव ग्रामपंचायत येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सोमवारी दिनांक १ सप्टेंबर रोजी परिसरातील सर्व मराठा बांधवानी रॅली साठी उवस्थित रहावे असे आव्हान करण्यात आले.
बैठकीस शिवसेना उपजिल्हा प्रमुख ( उबाठा )प्रकाश पाटील, माजी सरपंच प्रकाश डेळेकर, ग्रा.प. सदस्य राजेंद्र देसाई, रामराव देसाई, अजित देसाई, गणेश देसाई,कुंडलिक पाटील, आदित्य देसाई,अरुण देसाई, नामदेव पाटील आदी उपस्थित होते. स्वागत व आभार शशिकांत पाटील यांनी मांडले.