मराठा आंदोलनासाठी पाच हजार युवक मुंबईला जाणार, लिंगायत,मुस्लिम व ख्रिश्चन धार्मि्यांचा पाठिंबा. कडगाव येथील पदयात्रेत निर्धार.

मराठा आंदोलनासाठी पाच हजार युवक मुंबईला जाणार,
लिंगायत,मुस्लिम व ख्रिश्चन धार्मि्यांचा पाठिंबा.
कडगाव येथील पदयात्रेत निर्धार.
सिंहवाणी ब्युरो : शैलेंद्र उळेगड्डी
भुदरगड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने पाच हजार युवक मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई येथील मराठा आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुंबईला जाण्याचा निर्धार कडगाव (ता .भुदरगड) येथील पदयात्रेत करण्यात आला. मुंबई येथील आंदोलनाला पाठिंबा देण्या सोबतच मुंबई येथील आंदोलकांना आपल्या विभागातील मुंबई वासियांनी पाणी, जेवण व राहण्याची सोय आदी मदत करण्याचे आव्हान आंदोलकांच्या वतीने करण्यात आले. सोमवारी सकाळी ११ वाजता कडगाव येथील मुख्य बस स्थानकापासून पद यात्रेला सुरुवात झाली.
या पदयात्रेत कडगाव पाटगाव परिसरातील हजारो युवक,महिला सहभागी झाले होते.एक मराठा लाख मराठा, हम सब जरांगे, अभी नही तो कभी नही.अशा घोषणा देत मुख्य बाजारपेठ,ग्रामपंचायत चौक या प्रमुख मार्गावरून पदयात्रा काढण्यात आली.यावेळी भगव्या चौकात झालेल्या सभेत बिद्रीचे संचालकमाजी सभापती धनाजीराव देसाई, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील,कॉम्रेड सम्राट मोरे,संतोष मेंगाने,मानसिंग पाटील,ॲड. दयानंद कांबळे,कृष्णा भारतीय,युवराज पाटील,बाजीराव देसाई,हिंदुराव राणे,संदीप देसाई यांची भाषणे झाली. यावेळी लिंगायत समाजाच्या वतीने लिंगायत धर्म महासभेचे तालुका अध्यक्ष शैलेंद्र उळेगड्डी,ख्रिश्चन समाजाच्या वतीने झेवियर डिसोजा मुस्लिम समाजाच्या वतीने मुन्ना मुलांनी यानी आंदोलनास पाठिंबा दिला. यावेळी माजी सभापती बाबा नांदेकर,काका देसाई,नंदू शिंदे,माजी सरपंच शिवाजीराव देसाई,रामदास देसाई,रमेश रायजादे,ऋषिकेश जाधव,अविनाश शिंदे, शहाजी देसाई,महादेव दबडे,बाळासाहेब भालेकर,दत्ताआण्णा,अरुण देसाई,देसाई,पांडुरंग डेळेकर,अजित देसाई,कुंडलिक पाटील,गणेश देसाई, गजानन देसाई,राहुल देसाई,आदित्य देसाई,काशिनाथ देसाई,उपस्थित होते.स्वागत मिलिंद देसाई यांनी तर प्रास्ताविक प्रकाश डेळेकर तर आभार शशिकांत पाटील यांनी मानले.
फोटो: मराठा आरक्षणाच्या पाठिंब्यासाठी कडगाव येथे निघालेली पदयात्रा.