सागर मोरे सेट परीक्षा उत्तीर्ण: पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी

सागर मोरे सेट परीक्षा उत्तीर्ण:
पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी :
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य सहाय्यक प्राध्यापक पदासाठीच्या राज्य पात्रता परीक्षेत खानापूर (ता.भुदरगड) येथील प्राथमिक शिक्षक सागर साताप्पा मोरे मराठी विषयातून पहिल्याच प्रयत्नात सेट (SET) परीक्षा उत्तीर्ण झाले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून १५ जून २०२५ रोजी चाळीसाव्या राज्य पात्रता परीक्षेचे (सेट) आयोजन केले होते. त्याचा निकाल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नुकताच जाहीर झाला. यामध्ये खानापूर (ता.भुदरगड) येथील उपक्रमशील प्राथमिक शिक्षक सागर मोरे यांनी पहिल्याच प्रयत्नात मराठी विषयातून यशाला गवसणी घातली. श्री सागर मोरे हे विद्या मंदिर कळंबा (ता.करवीर) येथे अध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे, शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ. बी.एम. हिर्डेकर, उपायुक्त सागर कांबळे, गटशिक्षणाधिकारी अर्चना पाथरे, शिवाजी विद्यापीठ दूरशिक्षण विभाग प्रमुख डॉ. कृष्णा पाटील, डॉ. विश्वास सुतार, विस्तार अधिकारी आनंदराव आकुर्डेकर, मुख्याध्यापिका सुवार्ता व्हरकट, यांची प्रेरणा व मार्गदर्शन मिळाले तर आर.जे.कांबळे, सुरेखा भोरे, सुशांत खांडेकर यांचे सहकार्य लाभले