भुदरगड तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीने गारगोटीत आनंदोत्सव: घोषणाबाजीने क्रांती चौक दणाणला

भुदरगड तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीने गारगोटीत आनंदोत्सव
घोषणाबाजीने क्रांती चौक दणाणला
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
मुंबई येथील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश मिळाल्यामुळे भुदरगड तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीने आज गारगोटी येथे क्रांती चौकात साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी क्रांती चौक घोषणांनी दुमदुमून गेला.यावेळी साखर पेढे वाटप करण्यात आले.

मुंबई येथील आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु होते, त्यांच्या मागण्या मान्य केल्यामुळे आज गारगोटीत साखर पेढे वाटण्यात आले, यावेळी मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष आनंद चव्हाण यांनी महाराष्ट्र शासनाचे आभार मानतानाच मुंबई जाम करण्याची ताकद मराठा समाजामध्ये आहे हे साऱ्या जगाला दाखवून दिले आहे.शिस्तबद्ध आंदोलन कसे करायचे हा आदर्श मराठा समाजाने घालून दिला आहे. यापुढे मराठा समाजाने संघटित राहून आरक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले, यावेळी तालुक्यातील मुस्लिम, लिंगायत, बौद्ध, भाट समाजाने या आंदोलनास पाठींबा दिल्याबद्दल त्या समाजाच्या प्रतिनिधीचा सत्कार करण्यात आला.
बिद्री साखर कारखान्याचे संचालक राहुल देसाई, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शामराव देसाई, मराठा महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रविणसिंह सावंत, मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष नंदकुमार शिंदे, कॉ सम्राट मोरे,गारगोटीचे सरपंच प्रकाश वास्कर,उपसरपंच प्रशांत भोई,उद्योगपती सयाजी देसाई, मार्केट कमिटीचे संचालक प्रा शेखर देसाई,शिवसेनेचे तालुकाध्यक्ष संग्राम सावंत,अजित देसाई, मानसिंग देसाई,मच्छिन्द्र मुगडे, अनिल देसाई, संतोष पार्टे, रमेश माने,संदीप पाटील,तुकाराम देसाई, संग्रामसिंह पोफळे, रणधीर शिंदे,दंडवते,दिलीप देसाई, काँग्रेसचे संदीप देसाई (वेंगरूळ ) धनश्री हातकर,प्राचार्य डी एस देसाई, मुनीम देसाई, प्रकाश डेळेकर, (कडगाव )गणेश देसाई, मिलिंद देसाई, अजित देसाई, राजेंद्र देसाई,रामराव देसाई, शैलेंद्र उळेगड्डी, राहुल देसाई (मडिलगे)यांच्यासह मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते,गारगोटीचे सरपंच प्रकाश वास्कर यांनी शेवटी आभार मानले.
फोटो ओळ
-गारगोटी येथे भुदरगड तालुक्यातील मराठा समाजाचे आनंद सोहळ्यात बोलतांना प्रा आनंद चव्हाण,प्रविणसिंह सावंत, बाजूस राहुल देसाई, शामराव देसाई, सरपंच प्रकाश वास्कर आदी