शाहू कुमार भवन गारगोटी प्रशालेत श्री गणेशा आरोग्याचा व एड्स प्रतिबंध उपाययोजना* उपक्रम

शाहू कुमार भवन गारगोटी प्रशालेत
श्री गणेशा आरोग्याचा व एड्स प्रतिबंध उपाययोजना* उपक्रम
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
आरोग्य विभाग कोल्हापूर व उपजिल्हा रुग्णालय गारगोटी यांच्या संयुक्त विद्यमानाने *श्री गणेशा आरोग्याचा व एड्स प्रतिबंध उपाययोजना* हा उपक्रम श्री शाहू कुमार भवन गारगोटी या प्रशालेमध्ये दिनांक 4 सप्टेंबर 2025 रोजी संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी डॉक्टर स्नेहल कुलकर्णी, डॉक्टर शेट्टी मॅडम व तंत्रज्ञ जयश्री पाटील उपस्थित होत्या. या कार्यक्रमाच्या वेळी त्यांनी शारीरिक आरोग्य मानसिक आरोग्य सामाजिक आरोग्य व्यक्तिमत्व विकास व्यायाम व एड्स जनजागृती यावर सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या वेळी प्रशालेचे मुख्याध्यापक डॉक्टर एस बी. शिंदे पर्यवेक्षक डी एल सावंत व शाळेतील दहावीच्या सर्व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे नियोजन सौ एस.पी यादव यांनी केले सूत्रसंचालन सौ.पी.एम शिंदे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार सौ पलंगे यांनी मांडले.
