मानसिक स्वास्थ्यासाठी सुसंवाद आवश्यक : डॉ. स्नेहल कुलकर्णी गारगोटी हायस्कूलमध्ये ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियान

मानसिक स्वास्थ्यासाठी सुसंवाद आवश्यक :
डॉ. स्नेहल कुलकर्णी
गारगोटी हायस्कूलमध्ये ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियान समारंभ संपन्न
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
व्यक्तिगत, सामाजिक व मानसिक आरोग्य चांगले असेल तर माणूस समाधानी असतो. मानसिक स्वास्थ्यासाठी सुसंवाद असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल कुलकर्णी यांनी केले.
गारगोटी हायस्कूल व श्री. समर्थ कनिष्ठ महाविद्यालय येथे सार्वजनिक आरोग्य विभागा च्या ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या आरोग्य अभियानांतर्गत आयोजित समारंभात डॉ. कुलकर्णी बोलत होत्या. यावेळी गारगोटी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. पल्लवी तारळकर प्रमुख उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य मिलिंद पांगिरेकर होते.
यावेळी बोलताना डॉ. कुलकर्णी म्हणाल्या, चांगल्या आरोग्यासाठी आहार व व्यायाम या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. शालेय वयात मोबाईलपासून दूर राहणे आवश्यक असल्याचे सांगितले.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. पल्लवी तारळकर यांनी शासनाच्या विविध आरोग्य विषयक योजनांची माहिती दिली. प्रयोगशाळा तंत्रज्ञ सौ. जयश्री नारकर-पाटील यांनी एच. आय. व्ही. एड्स बाबत तसेच उपाय योजनांबाबत माहिती दिली. यावेळी प्रा. शेखर देसाई, प्रा.सौ. लता पाळेकर, प्रा. सौ. रोहिणी निकम यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. शेवटी आभार प्रा.सौ. स्नेहा साळोखे यांनी मानले.