जिल्हाताज्या घडामोडी
भुदरगड तालुक्यातील कुंभारवाडीत पारंपारिक पद्धतीने गणेशाचे विसर्जन

भुदरगड तालुक्यातील कुंभारवाडीत पारंपारिक पद्धतीने गणेशाचे विसर्जन
सिंहवाणी ब्युरो / योगेश कोळी शेणगाव :
भुदरगड तालुक्यातील कुंभारवाडी येथे अतिशय पारंपारिक पद्धतीने गणेशाचे विसर्जन करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला,टायगर स्पोर्ट् कुंभारवाडी या मंडळाच्या वतीने यंदाची गणेश विसर्जन मिरवणूक हि विठ्ठलच्या भजनाने आणि वारकरी संप्रदायाच्या गजराने दुमदुमून गेली,खरंतर भुदरगड तालुक्यातील कुंभारवाडी हे अतिशय छोटंसं गाव येथील वैशवाणीसमाज हा वारकरी संप्रदायात रमलेला समाज अशी ओळख, पंचक्रोशीत आहे.पण या गावाचा आदर्श अखंड कोल्हापूर जिल्ह्याने घ्यावा असा गणेश विसर्जनाचा कार्यक्रम आगळावेगळ्या पद्धतीने पार पाडला.कुंभारवाडीतील सर्वांच्या सहकार्याने पारंपारिक पद्धतीने भजन मृदंगाच्या गजरात गणरायाला वंदन करत गणरायाचा निरोप घेतला आहे,
