*संस्था मोठी नसते, तर तिच्यातून घडणारी माणसं मोठी असतात. प्राचार्य प्रकाश हाके*
संस्था मोठी नसते, तर तिच्यातून घडणारी माणसं मोठी असतात. प्राचार्य प्रकाश हाके
सिंहवाणी ब्युरो / तासगाव:
संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय, तासगाव येथे शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या खंबीर सहचारिणी, स्वातंत्र्यलढ्यातील भूमिगत कार्यकर्त्यांना मदत करणाऱ्या आणि अनाथ विद्यार्थ्यांना मायेची ऊब देणाऱ्या संस्थामाता सुशीलादेवी यांना त्यांच्या जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात सुशीलादेवी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर प्रशिक्षणार्थींनीनी संस्थामाताच्या जीवनावर आधारित भित्तीपत्रिकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाद्वारे त्यांच्या शिक्षण, स्वातंत्र्यलढा आणि सामाजिक कार्यातील योगदानाला उजाळा देण्यात आला.या प्रसंगी विभाग प्रमुख प्राचार्य प्रकाश हाके,संस्थेचे आजीवन सदस्य तथा मार्गदर्शक श्री.एच.बी.पाटील, व्ही जे मस्के, व्ही.एच पाटील, श्री बेडगे सर, प्रा. वासुदेव गुरव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात सर्व मान्यवरांनी संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या संघर्षमय जीवनावर आपले विचार व्यक्त केले. प्रशिक्षणार्थी मनोगतामध्ये सारिका पाटील व वनिता तुपे यांनी विचार व्यक्त केले
त्यानंतर प्राचार्य प्रकाश हाके यांनी संस्थामाता यांच्या आयुष्याचे ध्येय सर्वसामान्य मुला-मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हेच होते.असे मत प्रतिपादित केले. पुढे ते म्हणाले, “त्यांचे विचार साधे, सरळ पण जीवनाला दिशा देणारे होते.शिक्षणाशिवाय समाज उन्नत होऊ शकत नाही ग्रामीण व दुर्बल घटकांपर्यंत शिक्षण पोहोचवणे हीच खरी समाजसेवा माणुन कार्य संस्थामा तांनी केले.” “संस्था मोठी नसते, तर तिच्यातून घडणारी माणसं मोठी असतात” संस्थेचा उद्देश केवळ इमारती उभारणे नसून, चारित्र्यसंपन्न आणि संस्कारसंपन्न माणसं घडवणे हा आहे.असे मत व्यक्त केले.
डॉ.ए.एस.चिखलीकर यांनी आपले विचार व्यक्त करताना विद्यार्थिनींनी स्वावलंबी व्हावे महिला शिक्षणातूनच समाजाला खरी प्रगती साधता येते.सदाचार व शिस्त हीच खरी संपत्ती. शिक्षणाबरोबरच नैतिकता, प्रामाणिकपणा आणि शिस्त यावर त्यांनी भर दिला. समाजातील दुर्बल, वंचित घटकांना मदत करणे म्हणजे ईश्वरसेवा असे मत प्रतिपादित केले.
प्राचार्य डॉ.बी.एम पाटील यांनी सुशीलादेवी यांच्या त्यागमय जीवनकार्याचा गौरव केला. “संस्थामाता सुशीलादेवी यांचे शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान आजही प्रेरणादायी आहे. त्यांचा त्याग आणि समर्पण भावी पिढीला मार्गदर्शक आहे.”
सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील डॉ.एल.व्ही.भंडारे,डॉ.डी.टी.
खजूरकर डॉ.ए.एस.चिखलीकर, प्रा.ए.आर.पंडित ,तसेच कार्यालयीन कर्मचारी श्री संजय कुंभार,हणमंत वाघमारे,सुजाता हजारे,अस्मिता साळी, प्रशिक्षणार्थींनी उपस्थित होते. प्रास्ताविक कोमल नलवडे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता माने व नलिनी निकम यांनी केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.प्रमोद शेंडगे यांनी केले.कार्यक्रमाचे आभार वैष्णवी कांबळे यांनी केले.सर्वांनी त्यांच्या विचारांचा आणि आदर्शांचा प्रसार करण्याचा संकल्प व्यक्त केला.