कंत्राटी प्राध्यापकांना ‘समान काम, समान वेतन’ लागू, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

कंत्राटी प्राध्यापकांना ‘समान काम, समान वेतन’ लागू, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
सिंहवाणी ब्युरो / मुंबई:
हंगामी आणि कंत्राटी स्वरूपात काम करणाऱ्या सहाय्यक प्राध्यापकांना आता नियमित प्राध्यापकांएवढेच वेतन मिळाले पाहिजे, असे स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. “समान काम, समान वेतन” या घटनात्मक तत्त्वाचा आधार घेत न्यायालयाने शिक्षकांना सन्माननीय मोबदला देण्यावर भर दिला आहे. गुजरातमधील एका खटल्यात दिलेल्या या निर्णयाचा फायदा गोव्यातील कंत्राटी प्राध्यापकांनाही होणार आहे.
कंत्राटी प्राध्यापकांना ‘समान काम, समान वेतन’ लागू
न्यायमूर्ती पी.एस. नरसिंह आणि जयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने गुजरात सरकारला धारेवर धरत, वेतन संरचनेत सुसंगती आणण्याचे आदेश दिले. यामुळे देशभरातील हजारो कंत्राटी प्राध्यापकांना मोठा दिलासा मिळेल, असे स्पष्ट झाले आहे.
शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या योगदानानुसार योग्य मानधन मिळालेच पाहिजे, हीच न्यायालयाची ठाम भूमिका असल्याचेही नमूद करण्यात आले.