क्राईमजिल्हाताज्या घडामोडी

जेसीबी व मोटरसायकल चोरीप्रकरणी एकाला शिरोळ पोलिसानी केली अटक : ११ लाखाचा मुद्देमाल जप्त

जेसीबी व मोटरसायकल चोरीप्रकरणी एकाला शिरोळ पोलिसानी केली अटक :

११ लाखाचा मुद्देमाल जप्त

सिंहवाणी ब्युरो / शिरोळ :
जेसीबी मशीन व मोटरसायकल चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यास शिरोळ पोलिसांनी अटक करून त्याच्याकडील जेसीबी मशीन व मोटरसायकल असा ११ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी संशयित आरोपी मलिकसाब नबीसाब यरनाळ (वय ३४) मूळ रा. भैरववाडगी, तालुका देवर हिप्परगी जिल्हा विजापूर कर्नाटक राज्य, सध्या रा. नांदणी ता. शिरोळ) यास अटक करून जयसिंगपूर येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १० तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नऊ महिन्यापूर्वी नांदणी येथील अमोल बाळगोंडा पाटील यांच्या मालकीचे जेसीबी मशीन संशयित आरोपी मलिकसाब यरनाळ याने चोरून विजापूर जिल्ह्यातील भैरववाडगी या त्याच्या मूळ गावी नेली होते. त्याच्या विक्रीसाठी त्याचे प्रयत्न सुरू होते. ३ सप्टेंबर रोजी हरिश्चंद्र कारंडे (रा मिरज) हे त्यांच्या मोटरसायकल वरून शिरोळ ते धरणगुत्ती रोडवरील जंगली पिराजवळ गाडी लावून मित्राला भेटायला शेतात गेले होते. याच दरम्यान संशयित आरोपी यरनाळ हा बनावट चावीने मोटरसायकल घेऊन पसार झाला. तपासादरम्यान अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
या तपासकामी जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, जयसिंगपूर विभागाचे उपविभाग पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button