आता महाराष्ट्राचे रक्तही गुजरात कडे : टेम्पो भरून जाणारे रक्त आणि प्लाझ्मा जप्त : सोलापुरात होतेय रक्ताची तस्करी

आता महाराष्ट्राचे रक्तही गुजरात कडे :
टेम्पो भरून जाणारे रक्त आणि प्लाझ्मा जप्त
सोलापुरात होतेय रक्ताची तस्करी
सिंहवाणी ब्युरो / महेश गायकवाड सोलापूर
सोलापुरात मोठा कट रचला गेला आहे सोलापुरात जमा झालेल्या रक्तामधून प्लाझ्मा वेगळा करून तो गुजरात ला पाठवून देण्यात येत असल्याची गंभीर घटना सोलापुरात उघडकीस आली आहे सोलापुरातील एका नामवंत रक्तपेढी ने रक्ताची तस्करी करून हे रक्त आणि प्लाझ्मा हजारो किंमतीने गुजराथ मध्ये विक्री करत असल्याचे आढळून आले आहे
सोलापुरातील अनेक सामाजिक संस्था सामाजिक मंडळे तसेच अनेक नागरिक आणि शाळा व कॉलेज मधून सामाजिक बांधिलकी म्हणून मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर राबवून रक्तदान केले जात असते परंतु या रक्तदान शिबिरामधून जमा झालेल्या रक्ताची तस्करी केली जात असल्याचे उघड झाले आहे रक्तदान शिबिराच्या माध्यमातून जमा करण्यात आलेल्या रक्ताची गुजरात मध्ये विक्री करून मोठा पैसा मिळविला जात असल्याचे कळते. रक्त दानानंतर सोलापुरातील विविध रक्तपेढ्या मध्ये रक्त गोळा केले जात असते जमा करण्यात आले ले हे रक्त गरजू व्यक्तीला देण्यात यावे हा उद्देश असतो परंतु या उद्देशाला हरताळ फासून जमा करण्यात आले ले हे रक्त गुजरात राज्यात पाठविले जात असल्याचे कळते. सोलापुरात तस्करी करून हे रक्त गुजरात मध्येपाठविले जात असल्याचे उघडकीस आले आहे. सात रस्ता परिसरास महाराणा प्रताप चौकात गुजरात पासिंग च्या मिनी टेंपो मधून सोलापुरातील एका नामवंत रक्त पेढींधून जेवापास दीड हजार रक्ताच्या पिशव्या आणि प्लाझ्मा गुजरात मध्ये घेऊन चालले होते. सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग अधिकारी डॉ राखी माने यांच्याकडे आलेल्या तक्रारी नंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
सोलापूर शहरा मधून रक्तदाना मधून जमा झालेल्या रक्ताची आणि या रक्ता मधून प्लाझ्मा काढून त्याची गुजरात व इतर राज्यात तस्करी केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. दिनांक 10 सप्टेंबर रोजी प्लाझ्मा घेऊन जाणाऱ्या वाहनांस पकडून सदर बाजार पोलिस ठाण्यात नेण्यात आले होते. यानंतर सोलापूर महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी यांना हा प्लाझ्मा जप्त केला होता. परंतु प्लाझ्मा मध्ये काही घटक मिसळल्या चे आढळून आल्यामुळे सोलापुरातील अन्य रक्त पेढ्यांनी हे रक्त व प्लाझ्मा घेण्यास नकार दिला आहे.
दरम्यान सोलापुरात ज्या रक्तपेढी ने हे रक्त व प्लाझ्मा गुजरात व अन्य राज्यात पाठविण्यासाठी जी परवानगी हवी असते ती या रक्त पेढी कडे असल्याचे कळते.
सोलापूर शहरामधून एवढ्या मोठ्या प्रमाणात प्लाझ्मा आणि रक्त परराज्यात का नेले जात होते या रक्ताची व प्लाझ्मा ची तस्करी कुणामार्फत केली जात होती या प्रश्नाची उत्तरे मात्र अनुत्तरित राहिली आहेत.
सोलापुरात अनेक सामाजिक संस्था आणि संघटनांच्या माध्यमातून त्यांच्या सामाजिक कार्यक्रमा मध्ये रक्तदान शिबिर भरवून रक्त जमा करण्यात येत असते इतकेच नाही तर शाळा कॉलेज आणि महापुरुषांच्या जयंती निमित्त किंवा पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यासाठी रक्तदान शिबिर भरवून रक्त जमा केले जाते. हे रक्त ज्या रक्त पेढ्या जमा करतात
त्यांच्या कडून या रक्ताचे पुढे काय केले जाते हे कुणालाच माहीत नाही हे रक्त पर राज्यात विक्री केले जात असल्याचे कळते सोलापुरात रक्तदान शिबिराचे माध्यमातून जमा झालेल्या रक्ताची चक्क तस्करी केली जात असल्याचे कळते त्यामुळे सोलापुरात जमा होणारे रक्त हे सत्कर्मी न लागता त्याच्या माध्यमातून पैसा गोळा केला जात असल्याचे उघडकीस आले आहे.
ठळक बाबी
रक्तातील प्लाझ्मा चा वापर हा प्रामुख्याने तीन कामासाठी केला जात असतो. त्यात रुग्णाच्या इंजेक्शन साठी
डेंग्यू रुग्णावरील उपचारासाठी
कॉस्मोटिक
कारणासाठी प्लझमा चा वापर केला जात असतो
प्लाझा घेऊन तरुण राहण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्याचा वापर वाढला आहे..
यामुळे परराज्यात जाणारा हा प्लाझ्मा कास्मोटिक कारणासाठी लागणारे सौंदर्य प्रसाधने या साठी
वापरला जात असल्याचे कळते यासाठीच सोलापुरात दर दिवसाला जमा होणाऱ्या रक्ताची तस्करी केली जात असल्याचे उघडकीस आले आहे.
सोलापुरात मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिराच्या माध्यमातून रक्त गोळा केले जात असते.
जमा झालेले हे रक्त समाजातील गोरगरीब आणि गरजू रुग्णासाठी वापरण्यात यावे हा आमचा उद्देश असतो म्हणून आम्ही दरवर्षी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिराच्या माध्यमातून रक्त गोळा करून ते रक्त पेढ्या मध्ये पाठवितो पण पुढे या रक्ताचे काय केले जात होते हे माहित नव्हते
आता या रक्ताची प्लाझ्मा काढून तस्करी केली जात असल्याचे उघडकीस आले आहे ही बाब अतिशय गंभीर असून या पुढे आम्ही खाजगी रक्त पिढीस रक्त न देता सिव्हिल हॉस्पीटल मधील रक्त पिढीस रक्त पुरवठा करू