शिवाजी विद्यापीठाच्या युवा महोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्रात कला व संस्कृतीचे जतन : डॉ.टी.एम.चौगले शिवराज महाविद्यालयात ‘शिवाजी विद्यापीठाचा युवा महोत्सवा’चा शुभारंभ

शिवाजी विद्यापीठाच्या युवा महोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्रात कला व संस्कृतीचे जतन :
डॉ.टी.एम.चौगले
शिवराज महाविद्यालयात ‘शिवाजी विद्यापीठाचा युवा महोत्सवा’चा शुभारंभ
सिंहवाणी ब्युरो / गडहिंग्लज :
पश्चिम महाराष्ट्रात कला व संस्कृतीचे जतन शिवाजी विद्यापीठाच्या युवा महोत्सवाच्या माध्यमातून केले जात आहे. महाविद्यालयीन तरुणाईला कलेच्या अभिव्यक्तीची संधी देण्याचे कार्य शिवाजी विद्यापीठ नेहमीच करीत असते. त्यासाठी जिल्हास्तरीय व मध्यवर्ती युवा महोत्सवाचे आयोजन दरवर्षी पर्वणी असते. या युवा महोत्सवाच्या माध्यमातून महाविद्यालयीन तरुणांचा जल्लोष व उत्साह व्दिगुणित करण्याचे कार्य होत आहे. विद्यार्थ्यांनी कलागुणांना मिळणाऱ्या संधीतून आपल्या कलेचा अविष्कार घडवावा आणि त्यातून त्यांनी आनंद घेऊन घ्यावा यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून १४ कलाप्रकारातून वैयक्तिक व सांघिक स्पर्धा होत असतात. यातून मध्यवर्ती युवा महोत्सवासाठी प्रत्येक कलाप्रकारातून एक ते पाच विजेते निवडले जातात. मध्यवर्ती युवा महोत्सव हा ३६ कलाप्रकार सादर करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळ्त असते. असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठ, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक. डॉ टी.एम.चौगले यांनी केले.
यावेळी डॉ टी.एम.चौगले यांनी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे यांनी शिवाजी विद्यापीठाच्या कमवा व शिका योजनेमध्ये विद्यार्थी दशेत मोलाचे असे योगदान दिले असल्याचे गौरवोद्गार काढले.
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या विद्यार्थी विकास विभाग व शिवराज महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘शिवाजी विद्यापीठ अंतर्गत 45 वा जिल्हा युवा महोत्सवा’चे उदघाटन कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांच्या प्रतिमेच्या पूजनाने व कुंडीतील रोपाला पाणी घालून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे होते. प्रारंभी शिवाजी विद्यापीठ गीत गायन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. एस.एम.कदम यांनी केले. या समारंभास शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. आर.डी. धमकले, अॅड.स्वागत परुळेकर, प्राणीशास्त्र अधिविभागाचे डॉ.एन.ए.कांबळे, कोल्हापूर जिल्हा युवा महोत्सव समन्वयक डॉ. आर. एच. अतिग्रे, अधिक्षक श्रीमती सुरेखा आडके, खेडूत शिक्षण मंडळाचे सचिव आर.पी.पाटील, शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष श्री. के.जी.पाटील, अॅड.दिग्विजय कुराडे, सचिव डॉ.अनिलराव कुराडे, श्री.एम.के.सुतार, प्रा.विश्वजीत कुराडे, संचालक प्रा.सौ.बिनादेवी कुराडे, श्री राजेंद्र मांडेकर, श्री नंदनवाडे गुरुजी, श्री बसवराज आजरी, प्रकाशराव तेलवेकर, पापा चौगुले व संस्थेचे अन्य मान्यवर रजिस्ट्रार डॉ.संतोष शहापूरकर, आदींची प्रमुख उपस्थिती लाभली.
याप्रसंगी शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिलराव कुराडे यांनी शिवाजी विद्यापीठाने ‘शिवराज’ला युवा महोत्सवाचे यजमानपद मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त करून शिवराज महाविद्यालय हे क्रीडा परंपरेबरोबरच कलासंस्कृतीही जपण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले यावेळी त्यांनी युवा महोत्सवाचे महत्व सांगून कलेच्या माध्यमातून मूळ कला जतन होत आहे असे प्रतिपादन केले.
अध्यक्षीय भाषणामध्ये शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये. स्वातंत्र्याबरोबर जन्माला आलेली आमची पहिली पिढी शिवाजी विद्यापीठात शिकून श्रमदानातून विद्यार्थी भवन उभारले आहे याचा सार्थ अभिमान वाटतो असे सांगितले. यावेळी शिवराज विद्या संकुलाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांना मिळालेली पारितोषिके ही शिवराजने जपलेल्या प्रयोगशील शिक्षणामुळे शक्य झाले असल्याचे सांगितले. महाविद्यालयाचा विद्यार्थी अर्णव बुवा यांनी राष्ट्रीय युवा महोत्सवात शास्त्रीय गायनामध्ये सुवर्णपदक पटकाविल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या युवा महोत्सवासाठी शिवाजी विद्यापीठ युवा महोत्सवाचे अध्यक्ष शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के, प्र-कुलगुरू डॉ.पी.एस.पाटील, कुलसचिव डॉ.व्ही.एन.शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ.श्रीमती एस.एस.पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.ए.एन.जाधव व सदस्य या युवा महोत्सव समितीच्या माध्यमातून आयोजित या महोत्सवामध्ये शिवाजी विद्यापीठ अंतर्गत विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी कलाकार, विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
विद्यार्थी लोकनृत्य, लोककला, एकांकिका, प्रहसिका, मुकनाट्य, पथनाट्य, समूहगीत,समूह गायन, प्रश्नमंजुषा, एकपात्री अभिनय, वक्तृत्व स्पर्धा -हिंदी,मराठी आणि इंग्रजी, वाद-विवाद या कला प्रकारात विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी स्पर्धक १२०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
सूत्रसंचालन डॉ.अशोक मोरमारे, डॉ.श्रद्धा पाटील, प्रा.गौरव पाटील यांनी केले. आभार समन्वयक डॉ.ए.जी.हारदारे यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन महाविद्यालयीन प्रा.सौ.बिनादेवी कुराडे, प्रा.विश्वजित कुराडे, प्रा.डी.यु.जाधव, डॉ.आर.पी.हेंडगे, प्रा.के.जे.अदाटे, प्रा.सौ.पी.ए.पाटील, प्रा.आर.बी.खोत यांच्या अधिपत्याखाली महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी स्वयंसेवक यांनी यशस्वीपणे करण्यात विशेष परिश्रम घेतले.