हिंदी भाषेचा सन्मान राष्ट्राचा अभिमान – डॉ.अश्विनी देशिंगे *वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय हिंदी दिन’ साजरा*

हिंदी भाषेचा सन्मान राष्ट्राचा अभिमान – डॉ.अश्विनी देशिंगे
*वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात ‘राष्ट्रीय हिंदी दिन’ साजरा*
सिंहवाणी ब्युरो / तासगाव ):
भारताला स्वातंत्र्य मिळवून देताना एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी महात्मा गांधीजींनी हिंदी भाषेचा वापर केला आणि सर्वांना एकसंघ केले.भाषेचा सन्मान करणे म्हणजेच राष्ट्राचा सन्मान करणे असे उद्गार डॉ.अश्विनी देशिंगे यांनी पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथे हिंदी दिनाच्या कार्यक्रमात बोलताना काढले. त्या पुढे म्हणाल्या हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळावा यांचा प्रयत्न आपण सर्वांनी मिळून केला पाहिजे . तसेच हिंदी भाषेतून विविध प्रकारचे करिअर करता येते. हिंदी भाषेचे साहित्य खूपच समृद्ध आहे हे सांगून हिंदी दिन साजरा करण्यामागची कारणे सांगून भाषेचा गौरव करणे ,भाषा आत्मसात करून ती अभिव्यक्त करणे हे ही तितकेच महत्वाचे आहे असा उल्लेख त्यांनी केला.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हिंदी दिनाचे औचित्य साधून भित्तिपत्रिकेचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना ज्युनिअर विभाग प्रमुख एस.डी.पाटील यांनी हिंदीची थोरवी कथन करून हिंदी भाषेतील करिअरच्या संधी सांगितल्या.हिंदी दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाची सुरुवात कु.सरिता कोळी हिच्या नृत्याविष्काराने झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख प्रा.ए.एस. निंबाळकर यांनी केले तर आभार कु.वंशिका गुप्ता हिने मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.मैथिली भस्मे हिने केले कार्यक्रमाला सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.आण्णासाहेब बागल प्रा.आर.के.नलवडे,प्रा.एस. आर.पाटील,प्रा.एस.व्ही. माळी, प्रा.फिरोज वलांडकर, प्रा.बी.एल.माने,प्रा.मयुरा जाधव,प्रा.डी.एन.यादव पाटील,प्रा.सविता कोळपकर यांसह महाविद्यालयातील प्राध्यापक,प्रशासकीय सेवक वर्ग ,विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.