उपजिल्हा रुग्णालय गारगोटीच्या वतीने स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान उद्यापासून *भुदरगड तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा: आवाहन*

उपजिल्हा रुग्णालय गारगोटीच्या वतीने स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान उद्यापासून
*भुदरगड तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा: आवाहन*
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबं कल्याण मंत्रालयाच्या वतीने सर्वत्र राष्ट्राच्या आरोग्य दृष्टीकोनात बदल घडविण्यासाठी दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत महिला व बालकांच्या विविध प्रकारच्या तपासण्या व आरोग्य शिबीरे आयोजित करण्यात आली आहेत.
या अभियानांतर्गत उपजिल्हा रुग्णालय गारगोटीच्या वतीने आरोग्यविषयक व्याख्याने, तपासणी शिबीरे आयोजित करण्यात आली आहेत.आयुष विभागातर्फे योगा व वेलनेस सेशन्स आयोजित करण्यात आली आहेत.रक्तदाब, मधुमेह, दंत नेत्ररोग तपासणी, स्तन व गर्भाशय मुख, मुख कर्करोग तपासणी, रक्त व हिमोग्लोबिन तपासणी, क्षयरोग तपासणी, मासिक पाळी व स्वच्छता, जीवनशैली व पोषण, नागरिकांचा सक्रिय सहभाग.. असे अनेकविध कार्यक्रम या उपक्रमांतर्गत राबवले जाणार आहेत.
दि. २० सप्टेंबर रोजी उपजिल्हा रुग्णालय गारगोटी येथे महाआरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरासाठी जिल्हा स्तरावरील विविध तज्ञ डॉक्टर्स उपस्थित राहणार आहेत. तसेच उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधिकाऱ्यांची एक टीम गारगोटीतील विविध शाळांमधे जाऊन प्रबोधनपर व्याख्याने व आरोग्य शिबिरांचे नियोजन करणार आहे तरी भुदरगड तालुक्यातील सर्व लाभार्थिंनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन उपजिल्हा रुग्णालय गारगोटीच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. पल्लवी तारळकर,आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल कुलकर्णी, डॉ. सविता शेट्टी,राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम वैद्यकीय अधिकारी डॉ. मीनाक्षी वारुषे डॉ.सविता कुंभार यांनी केले आहे.