सृजनशील लेखन करा – सोनम बाबर वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात वाङमय मंडळ उद्घाटन

सृजनशील लेखन करा – सोनम बाबर
वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात वाङमय मंडळ उद्घाटन
सिहवाणी ब्युरो / तासगाव
विद्यार्थी दशेतच आपल्याला साहित्य वाचनाची व लिहण्याची गोडी लागली पाहिजे. विद्यार्थ्यांनी सृजनशील लेखन करावे असे उद्गार सकाळ न्यूज च्या श्रीमती सोनम बाबर यांनी पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालय, तासगाव येथे वाङ्मय मंडळ उद्घाटन प्रसंगी बोलताना काढले. त्या पुढे म्हणाल्या साहित्य व पत्रकारिता यांचा विद्यार्थ्यांच्या जीवनावर होणारा परिणाम स्पष्ट करताना वाचन व लेखनाची आवड जपली पाहिजे”साहित्य ही समाजाला दिशा देणारी शक्ती असून त्याचा उपयोग समाजपरिवर्तनासाठी करणे ही तरुणाईची जबाबदारी आहे,” असे सांगून भाषेच्या विद्यार्थ्यांना पत्रकारिता क्षेत्रात असलेल्या संधी सांगितल्या.
अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांनी विद्यार्थ्यांना वाङमय मंडळाच्या उपक्रमांत सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले. “वांङमय मंडळ ही केवळ सर्जनशीलतेची शिदोरी नसून व्यक्तिमत्त्व घडविण्याचे व्यासपीठ असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाङमय मंडळ चेअरमन प्रा.वर्षा जगदाळे यांनी केले तर आभार डॉ.एन.एम.देसाई यांनी मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सविता कोळेकर यांनी केले.कार्यक्रमाला प्रा.प्रकाश खाडे, डॉ.तातोबा बदामे, प्रा.रमेश मोटे, डॉ.अश्विनी देशिंगे,प्रा.साईश्रद्धा कांबळे,सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.आण्णासाहेब बागल यांसह महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.