क्राईमजिल्हाताज्या घडामोडी

पुष्पनगर येथे सराफ दुकानातून एक लाखाचे सोन्या-चांदीचे दागिने, रक्कम लंपास

पुष्पनगर येथे सराफ दुकानातून एक लाखाचे सोन्या-चांदीचे दागिने, रक्कम लंपास


सिंहवाणी ब्युरो / गारगोटी :

पुष्पनगर (ता. भुदरगड)
येथील सराफी दुकानात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री धाड टाकत सोन्या-चांदीचे दागिने व रोख असा एकूण ८७हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना सोमवार (दि.१५) रोजी पहाटे उघडकीस आली. याबाबतची फिर्याद आशिष अरविंद होगाडे (वय ३४, रा. पुष्पनगर) यांनी भुदरगड पोलिसांत दिली आहे.

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, आशिष होगाडे यांचे गावातच सराफ दुकान आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सराफी दुकानाचे तसेच शेजारील गोडाउनचे शटर फोडून आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने, मूर्ती,
बार, अंगठ्या, बाळगोटे, कडदोरे, नथ अशा विविध वस्तूंसह ८७ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.

गाळा मालक शामराव रावजी बाबर यांच्या घराचे कुलूप तोडून चोरी करून चोर जात असताना आशिष होगाडे यांना आवाज आल्याने ते तिकडे गेले. त्यावेळी सुमारे आठ चोरटे चोरी करताना दिसले. ते पुढे जात असताना त्यातील एका चोरट्याने ‘आवाज केला तर तुला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी दिली. पण होगाडे यांनी आरडाओरड केल्याने अज्ञात चोरटे पळून गेले.

घटनेची माहिती मिळताच भुदरगड पोलिसांनी पंचनामा करून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक किरण लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शहाबाज शेख करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button