जिल्हाताज्या घडामोडी
स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियाना अंतर्गत गारगोटी उपजिल्हा रुग्णालयाचे उपक्रम

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियाना अंतर्गत गारगोटी उपजिल्हा रुग्णालयाचे उपक्रम
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
आजपासून भारत सरकारच्या *स्वस्थ नारी सशक्त परिवार* या अभियानाचा शुभारंभ झाला आहे. या अभियाना अंतर्गत गारगोटी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल कुलकर्णी यांनी म्हसवे, ता. भुदरगड येथे आयोजित केलेल्या महिला मेळाव्यामधे महिलांना शारीरिक व मानसिक आरोग्य, निरोगी जीवनशैली आणि पोषण यावर मार्गदर्शन केले.यावेळी एकूण ६५० महिला उपस्थित होत्या.

या कार्यक्रमासाठी म्हसवे गावचे सरपंच सर्जेराव देसाई, सर्व ग्रामस्थ यांचे विशेष सहकार्य लाभले.
गारगोटी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. पल्लवी तारळकर तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद कदम यांचे या कार्यक्रमाला सहकार्य लाभले.