क्राईमताज्या घडामोडी

पॉलिशच्या बहाण्याने तीन लाखांचे सोने लंपास: मोहिते वडगाव येथील घटना; एकास अटक

पॉलिशच्या बहाण्याने तीन लाखांचे सोने लंपास
मोहिते वडगाव येथील घटना; एकास अटक

सिंहवाणी ब्युरो / कडेगाव :
सोने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने दोन लाख 80 हजार रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना मोहिते वडगाव (ता. कडेगाव) येथे मंगळवारी दुपारी घडली. याप्रकरणी चिंचणी – वांगी पोलिसात तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दुर्गेश किसनकुमार गुप्ता (रा. म्हैसूर बाजार, जमालपूर, जि. खगडिया) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याचे साथीदार योगेश यादव व विकास सहा हे दोघे फरार आहेत.

मोहिते वडगाव येथे सुलोचना भिकाजी मोहिते (वय 70) या दुपारी घरामध्ये एकट्याच होत्या. तिघे संशयित त्यांच्या घरी आले. त्यांनी सुलोचना यांना सोने पॉलिश करून देतो, असे सांगितले. सुलोचना यांनी त्यांना सोन्याच्या बांगड्या, पाटल्या असे 56 ग्रॅमचे दागिने काढून दिले. संशयितांनी ते त्यांच्याकडे असलेल्या लिक्वीडमध्ये घालण्याचा बहाणा केला व सोन्याच्या बदल्यात बनावट सोने देऊन ते पसार झाले.

ते निघून गेल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे सुलोचना यांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसात धाव घेतली. त्यानंतर तपास सुरू केला. रात्री उशिरा संशयित दुर्गेश गुप्ता हा मोहिते वडगाव परिसरात सापडला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. इतर दोघे फरार झाले आहेत. चिंचणी-वांगी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल घुगे व पोलिस उपनिरीक्षक योगेश शेलार करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button