मारुती देवेकरांचे शैक्षणिक कार्य आदर्शवत: पालकमंत्री प्रकाश आबिटकर

मारुती देवेकरांचे शैक्षणिक कार्य आदर्शवत: पालकमंत्री प्रकाश आबिटकर
सिंहवाणी ब्युरो / पाटगांव :
मारुती देवेकर यांनी स्वहिताच्या व लाभाच्या गोष्टी बाजूला ठेवून जादा समयदान करून विद्यार्थ्यांसाठी आयुष्यभर कष्ट घेतले. त्यांनी संपूर्ण सेवा काळात दिपस्तंभा सारखे काम करून इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे. त्यांचे हे कार्य शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणा देणारे आहे, असे गौरव उद्गार महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी काढल
विद्या मंदिर सोनाळी (ता. भुदरगड) शाळेचे उपक्रमशील शिक्षक मारुती गणपती देवेकर यांना जिल्हा परिषदेचा ‘डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श शिक्षक’ पुरस्कार मिळाल्याबद्दल राज्य प्राथमिक शिक्षक संघ यांचे वतीने सत्कार प्रसंगी नामदार प्रकाश आबिटकर बोलत होते अध्यक्षस्थानी निवृत्त शिक्षण संचालक डॉ. दिनकर पाटील होते. यावेळी राहुल देसाई, नाथाजी पाटील, अर्जुन आबिटकर, रणजित पाटील, उपशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे, गटशिक्षणाधिकारी प्रबोध कांबळे, प्रमुख उपस्थित होते
डॉ दिनकर पाटील यांनी मारुती देवकर यांनी समाजातील गोरगरीब व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी केलेल्या अपार प्रयत्नांमुळे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनले. त्यांनी गेली दोन दशके विद्यार्थी केंद्रबिंदू मानून शिक्षणाच्या प्रभावी मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम घडविला.असल्याचे मत व्यक्त केले
याप्रसंगी आम्रपाली देवेकर, तानाजी सणगर, मृणाल देवेकर यांनी मनोगत व्यक्त केल सरपंच रमेश थोरबोले, सरपंच प्रकाश वास्कर, उपसरपंच प्रशांत भोई, शिक्षणाधिकारी बी.एम.कासार, गटशिक्षणाधिकारी डॉ. विश्वास सुतार, संचालक बाळकृष्ण हळदकर, राजाराम वरूटे, आनंदराव जाधव, रवींद्र नागटिळे, बी.एस.पाटील, प्रमोद तौदकर, डॉ. शिवाजी रायकर, प्रा.एकनाथ पाटील, मुख्याध्यापिका स्नेहलता इंदुलकर, विजय रामाणे, तानाजी धारपवार, नानासाहेब देसाई, उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दशरथ कोटकर यांनी केले तर राजू शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.
——-
फोटो:
खानापूर: मारुती देवेकर यांनाआदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करतानाआरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर सोबत आम्रपाली देवकर व अन्य
——