मराठा समाजावर अन्याय होवू देणार नाही: वसंतराव मुळीक : गडहिंग्लज येथे सकल मराठा समाज मेळावा उत्साहात!

मराठा समाजावर अन्याय होवू देणार नाही: वसंतराव मुळीक
गडहिंग्लज येथे सकल मराठा समाज मेळावा उत्साहात!
सिंहवाणी ब्युरो / गडहिंग्लज :
मराठा आरक्षण हा समाजाचा हक्क असला तरी त्याचा इतर समाजावर देखील परिणाम होवू नये. मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी शासन दरबारी लढा सुरू आहे. समाजावर अन्याय होवू देणार नाही. मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी आपण कटीबध्द आहोत असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी समाजाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी गडहिंग्लज येथे आयोजित विभागीय मेळाव्यात
केले.
अखिल भारतीय मराठा महासंघाचा तीन तालुक्यांतील अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकारी यांचा मेळावा संपन्न झाला. 28 सप्टेंबर रोजी कोल्हापुर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय मेळाव्याची पूर्वतयारी म्हणून गडहिंग्लज, आजरा व चंदगड मधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला. अध्यक्ष स्थानी अखिल भारतीय महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक होते. व्यासपीठावर जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी भुकेले, जिल्हा उपाध्यक्ष प्राचार्य सी आर देसाई, आजरा तालुका अध्यक्ष विठोबा चव्हाण ,चंदगड तालुकाध्यक्ष सुरेश सातवणेकर, चंदगड तालुका महिला अध्यक्षा पूजाताई शिंदे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे स्वागत सुधीर उर्फ आप्पा शिवणे यांनी केले. मराठा आरक्षणावर होत असलेल्या अन्यायाबाबत व सुरू असलेल्या संघर्षाबाबत उपस्थितांना माहिती दिली. मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. तर प्रास्ताविकामध्ये प्राध्यापक शिवाजी भुकेले यांनी अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांनी केलेल्या संघर्षाची माहिती सांगितली. युवा जिल्हाध्यक्ष अवधूत पाटील,आजरा तालुकाध्यक्ष विठोबा चव्हाण व चंदगड तालुकाध्यक्ष सुरेश सातवणेकर, मनसे जिल्हाप्रमुख नागेश चौगुले यांचीही मनोगते झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी सुरू असलेला लढा आपला हक्क व अन्यायासाठी आहे .पण हे करत असताना कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही यासाठी आपण कार्य करत असल्याचे सांगितले. 1982 साली स्थापन झालेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ याची सुद्धा माहिती दिली. कोल्हापुर येथील मेळाव्यासाठी गडहिंग्लज, आजरा व चंदगड मधील बहुसंख्येने मराठा बांधव उपस्थित राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी
दिलीप माने, वसंतराव यमगेकर, प्रकाश पोवार, राजेंद्र चव्हाण, शहराध्यक्ष सागर कुराडे, शहर उपाध्यक्ष शिवाजी कुराडे, प्रकाश तेलवेकर, नाथाजी रेगडे , कार्याध्यक्ष बबन कळेकर, जय गणेश चे संजय पाटील , सागर मांजरे, मनोज पवार,विजय केसरकर ,स्वप्निल साळुंखे , राजू दादा रोटे, अरुण जाधव, दत्तात्रय गोरे, ओमजीत शिवणे पवन शिवणे , मयूर गोरे, हर्षल शिवणे ,विशाल शिवणे , संजय दळवी, संभाजी आढावकर , दीपक खांडेकर, सौरभ मांडेकर, धनंजय घुले, शैलेश इंगवले , संतोष भोसले, प्रदीप कोलते, सुभाष चौगुले, राजेंद्र कोंडुस्कर, राहुल शिंदे, सोनू फडणीस , दिगंबर देसाई, यांनी परिश्रम घेतले .सूत्रसंचलन दिनकर खवरे यांनी केले.