जिल्हाताज्या घडामोडी

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत कर्मवीर हिरे महाविद्यालयात शिबीर उपजिल्हा रूग्णालय गारगोटीचा उपक्रम*

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत
कर्मवीर हिरे महाविद्यालयात शिबीर


उपजिल्हा रूग्णालय गारगोटीचा उपक्रम*

सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत आज कर्मवीर हिरे महाविद्यालय येथे मुलींना शारीरिक आरोग्य व आहार विषयी आयुष वैद्यकीय अधिकारी, उपजिल्हा रूग्णालय गारगोटी येथील डॉ. सविता शेट्टी व मानसिक आरोग्याविषयी डॉ स्नेहल कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले तसेच मुलींची व शिक्षिकांची रक्ततपासणी साक्षी पाटील व विद्या निकम यांनी केली .अधिपरिचारिका सौ. अस्मिता आसबे यांचे सहकार्य मिळाले.
या शिबिरात दिलेल्या आरोग्यविषयक सेवेबद्दल मुलींनी व शिक्षकांनी सुंदर अभिप्राय दिला.
यासाठी कर्मवीर हिरे महाविद्यालय गारगोटीचे प्राचार्य श्री यू. आर. शिंदे , उपप्राचार्य श्री देसाई , समाजकार्य विभागाचे चौगुले सर, सौ. सुप्रिया शिंदे मॅडम , सौ. रायजाधव मॅडम, सौ प्रधान मॅडम व इतर स्टाफ यांनी आयोजन केले.
यासाठी उपजिल्हा रूग्णालय गारगोटीच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. पल्लवी तारळकर मॅडम, डॉ. मिलिंद कदम यांचे विशेष सहकार्य लाभले.
यावेळी 200 विद्यार्थीनी व 15 शिक्षकवृंद उपस्थित होते. एकूण 250 जणांची प्रयोगशाळा तपासणी करण्यात आली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button