जिल्हाताज्या घडामोडी

कोल्हापूर येथील २८ सप्टेंबर रोजीच्या राज्यव्यापी मराठा मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहा –वसंतराव मुळीक

कोल्हापूर येथील २८ सप्टेंबर रोजीच्या राज्यव्यापी मराठा मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहा

वसंतराव मुळीक

सिंहवाणी ब्युरो / गारगोटी :
अखिल भारतीय मराठा महासंघाचा राज्यस्तरीय मराठा मेळावा कोल्हापूर येथे रविवार दि. २८ सप्टेंबर २०२५ रोजी होत असून या मेळाव्यास मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी गारगोटी येथे केले, राज्यस्तरीय मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ते प्रत्येक तालुक्याचा दौरा करत आहेत, गारगोटी येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक महासंघाचे तालुकाध्यक्ष आनंद चव्हाण यांनी केले.
मुळीक पुढे म्हणाले, आपण गावगाड्यावरील सर्व जाती धर्माना बरोबर घेऊन जाणारे आहोत, शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर संस्थानात तोच विचारलं मांडला, अशा भूमीत हा मराठा मेळावा होत असून हे आपले भूषण आहे. या मेळाव्यात मराठा आरक्षणावर चर्चा होणार असून त्याशिवाय कुणबी नोंदीसाठी सातारा संस्थानाचे गॅझेट व कोल्हापूर संस्थानाचे गॅझेटवरही चर्चा होणार आहे, तसेच विध्यार्थ्यांसाठी सारथी संस्थेच्या सोई, सवलती, शिष्यवृत्ती व आण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या विविध योजना व मराठा समाजाच्या एकंदरीत आर्थिक, सामाजिक विकासाबद्दल चर्चा होणार आहे, कोल्हापूरला साजेसा असा हा मेळावा होणार असून भुदरगड तालुक्यातील मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. यावेळी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रविणसिंह सावंत यांचेही भाषण झाले. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष नामदेव चौगले, प्राचार्य डी एस देसाई, मच्छिन्द्र मुगडे,पार्थ सावंत, सतीश जाधव, सुरेश पाटील,रमेश माने, युवक अध्यक्ष अवधूत पाटील,उमेश देसाई, अनिल देसाई, वसंत चौगले, प्रा. विलास देसाई,नितीन बोटे, प्रसाद चौगले,यांच्यासह मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी प्रकाश डेळेकर (कडगाव) यांनी आभार मानले.

फोटो —
गारगोटी येथे बोलतांना वसंतराव मुळीक, जिल्हा उपाध्यक्ष प्रविणसिंह सावंत, तालुकाध्यक्ष आनंद चव्हाण, डी एस देसाई, प्रकाश डेळेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button