सेवा पंधरवडा अंतर्गत गारगोटी येथील वैकुंठधाम स्पशानभूमीचे स्वच्छता अभियान* गारगोटीतील युवक व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

सेवा पंधरवडा अंतर्गत गारगोटी येथील वैकुंठधाम स्पशानभूमीचे स्वच्छता अभियान
गारगोटीतील युवक व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी :
17 सप्टेंबर प्राधान मंत्री नरेंद्र मोदींचा वाढदिवस ,ते २ ऑक्टोबर महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती या पंधरा दिवसात सेवा पंधरवडा ही संकल्पना राबवण्यात येत असून ,त्यास अनुसरून आज गारगोटी येथील
” वैकुंठधाम ” स्मशानभूमीचे स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले होते . .
गारगोटी हे जवळपास 30 ते 35 हजार लोकसंख्येचे गाव असून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून या गावाकडे पाहिले जाते .गारगोटी शहरांमध्ये वेदगंगा नदी तीरावर सुसज्ज अशी स्मशानभूमी असून .या स्मशानभूमीला ” वैकुंठ धाम ” असे नाव देण्यात आले आहे .
या स्मशानभूमीच्या सभोवती विविध प्रकारचा केरकचरा, पाण्याच्या बॉटल्स , अनावश्यक पद्धतीने वाढलेली झुडपे ,अशा पद्धतीचा वेगवेगळ्या प्रकारचा कचरा पडलेला होता .अनेक दिवस सुरू असलेल्या पावसामुळे या परिसरात अनावश्यक झाडे झुडपे वाढलेली होती .
17 सप्टेंबर पासून सुरू असलेल्या सेवा पंधराव्या च्या अनुषंगाने या वैकुंठ धामाची स्वच्छता करण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टी व ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात आला होता त्यास अनुसरून
या स्वच्छता अभियानात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन गारगोटीचे नवनियुक्त उपसरपंच राहुल चौगुले यांनी केले होते त्या संस्कृत आज गारगोटी शहरातील जवळपास शंभरावर स्वयंसेवकांनी या अभियानात सहभाग घेतला .व बघता बघता वैकुंठ धाम परिसर स्वच्छ झाला .
या कार्यक्रमात भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील ,युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अलकेश कांदळकर ,गारगोटीची उपसरपंच राहूल चौगले ,ग्राम सदस्य राहूल जाधव , प्रा .राजेंद्र यादव (सर ) प्रताप चौगले, माजी ग्रा.प. सदस्य अजित चौगले ,विजय पाटील, संतोष किरुळकर , जालंदर कांबळे, गणेश सुतार बाबुराव पिंगळे , संग्राम शिगांवकर, अभिजीत सुतार, भुषण भस्मे , अक्षय सावंत , दौलत शिंदे , शुभम भाट , आकाश पिळणकर , अजय पवार , वैभव कोगे , सुहास मुदाळकर ,मिथील कांदळकर , संदिप सुतार, श्री निंबाळकर ,वीरकुमार पाटील , मुस्तफा शेख अशुतोष किरळकर , पारस पाटील, अदित्य पतंगे,रवी कौलकर विवेक देवर्डेकर सनी परीट बाबासाहेब कांबळे शाही मालवेकरआदींसह गारगोटी शहरातील युवक , नागरिक व ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाली होती .