पालकमंत्री श्री प्रकाशरावजी आबिटकर यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव उत्साहात संपन्न.

पालकमंत्री श्री प्रकाशरावजी आबिटकर यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव उत्साहात संपन्न.
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी :
कृषी विभाग, आत्मा व उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाजी महोत्सवाचे आयोजन व्ही. टी. पाटील स्मृती भवन कोल्हापूर येथे केले होते. या कार्यक्रमास पालकमंत्री प्रकाशरावजी आबिटकर उपस्थित होते. तसेच विभागीय कृषीसंचालक श्री. बसवराज मास्तोळी, प्रकल्प संचालक आत्मा श्री जालिंदर पांगरे उपस्थित होते.
रानभाजी महोत्सवामध्ये अनेक प्रकारच्या रानभाज्यांचे प्रदर्शन व पाककला स्पर्धाचे आयोजन केले होते. रानभाजीचे महत्व व त्याचे उपयोग या विषयावर वनौषधी व रानभाजी तज्ञ डॉ. शहाजी कुरणे व वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. मधुकर बाचुळकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी पालकमंत्री प्रकाशरावजी आबिटकर यांचा विशेष सत्कार राज्याबाहेरील अभ्यास दौऱ्यामधील शेतकरी व शासकीय पुरस्कार प्राप्त महासंघ यांचे वतीने सन्मानचिन्ह शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला. यावेळी शासकीय पुरस्कार प्राप्त संघाचे राज्य उपाध्यक्ष कृषीभूषण सर्जेराव पाटील जिल्हाध्यक्ष कृषीभूषण मच्छिंद्र कुंभार उपाध्यक्ष आप्पासाहेब पाटील सचिव शेतीमित्र शरद देवेकर तसेच अनेक शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री प्रकाशरावजी आबिटकर यांनी महिलांना व शेतकऱ्यांना संबोधित केले. रानभाजीचे सेवन केल्यामुळे शरीरातील व्याधी व आरोग्य विषयक रोग यांच्यावर मात करता येते.आपल्या जेवणामध्ये रानभाजीचा समावेश करा व आरोग्य तंदुरुस्त बनवा असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.
या कार्यक्रमास श्री दत्तात्रय उगले, विभागीय कृषी अधिकारी अजय कुलकर्णी, उमेदीच्या सुषमा देसाई, तालुका कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे,सर्व मंडळ कृषीअधिकारी, कृषी सहाय्यक, कृषी सखी यांची उपस्थिती होती.