स्वस्थ नारी सशक्त परिवार* *आयुष विभागातर्फे आजीचे स्वयंपाकघर हा विशेष उपक्रम साजरा* *स्थानिक व क्षेत्रीय आहाराला प्रोत्साहन*

*स्वस्थ नारी सशक्त परिवार*
*आयुष विभागातर्फे आजीचे स्वयंपाकघर विशेष उपक्रम साजरा*
*स्थानिक व क्षेत्रीय आहाराला प्रोत्साहन*
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
भारत सरकारच्या *स्वस्थ नारी सशक्त परिवार* या अभियाना अंतर्गत दि 20 सप्टेंबर रोजी गारगोटी उपजिल्हा रुग्णालयाच्या आयुष विभागा तर्फे आजीचे स्वयंपाकघर हा विशेष उपक्रम साजरा करण्यात आला. काळाच्या ओघात विस्मरणात गेलेल्या तेल व साखर विरहित अशा पोषक अन्नपदार्थांची चवीसह नव्याने ओळख करून देण्यात आली. बाजरीचा खिचडा पासून अहळीवाचे लाडू, डिंक लाडू, शेंगदाणा लाडू, पिंपळाच्या पानाची भाजी,लाह्या,लाह्याचे गोड- तिखट मुटके, तांदळाच्या वड्या,बांबूच्या कंदाच्या पुऱ्या,मेतकूट, कडीपत्ता, तीळ, जवस यांच्या चटण्या, भाजलेली कणिक, सोजीच्या वड्या, नाचणीची भाकरी लोणी, नाचणीची आंबील, कडधान्यांची मिसळ,शेवग्याच्या पानांच्या वड्या, तीळ-जवसाची बडीशेप.. अशा अनेक पदार्थांचा त्यात सामावेश होता.
*आजीचे स्वयंपाकघर* या अभिनव उपक्रमाला महिलांचा उत्स्फूत प्रतिसाद लाभला. १५० आशा वर्कर्स व २५० महिलांनी या पदार्थांबद्दल माहिती जाणून घेतली.
घरात व परिसरात उपलब्ध असलेल्या अनेक अन्नघटकांपासून अगदी कमी वेळेत तेल व साखरविरहित चविष्ट आणि पोषक अन्नपदार्थ कसे तयार करायचे याविषयी डॉ. स्नेहल कुलकर्णी व डॉ. सविता शेट्टी यांनी माहिती दिली. सौ मीना जंगम ह्यांचे विशेष सहकार्य लाभले.
गारगोटी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. पल्लवी तारळकर मॅडम, वैद्यकीय अधिकारी डॉ मिलिंद कदम सर, इनचार्ज सिस्टर स्मिता राऊत तसेच नर्सिंग स्टाफचे कार्यक्रमाला सहकार्य लाभले.