जनता सहकारी गृहतारण संस्थेला ५५ लाखावर नफा -११टक्के लाभांश –चेअरमन मारुती मोरे: संस्थेची २४ वी वार्षिक सभा संपन्न: संस्था यंदा रौप्यमहोत्सवी वर्षे करणार साजरे

जनता सहकारी गृहतारण संस्थेला ५५ लाखावर नफा -११टक्के लाभांश
—चेअरमन मारुती मोरे:
संस्थेची २४ वी वार्षिक सभा संपन्न:
यंदा रौप्यमहोत्सवी वर्षे करणार साजरे
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
जनता सहकारी गृहतारण संस्थेने काटकसरी कारभार, पारदर्शक व्यवहार व सभासद व ठेवीदारांचा विश्वास यामुळे या वर्षात १०० कोटी ठेवीचा टप्पा ओलांडला असून संस्थेला अहवाल सालात ५५. ५८ लाखावर नफा झाला आहे.त्यामुळे सभासदांना ११ टक्के लाभांश चेअरमन मारुती मोरे यांनी जाहीर केला. संस्थेची २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज दादाजी मल्टीपर्पज हॉल आजरा येथे संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.
चेअरमन मारुती मोरे पुढे म्हणाले, संस्थेचे भागभांडवल १ कोटी १९ लाख रुपयांच्या वर असून गुंतवणूक ३८. ९७ कोटीवर आहे.संस्थेने ६२ कोटीवर कर्ज वाटप केले आहे. यंदा संस्थेचे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने संस्थेकडून सर्व सभासदांच्या शेअर्समध्ये प्रत्येकी रुपये पाचशेची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.व कर्मचाऱ्यांना एक वेतनवाढ दिली जाणार आहे.शिवाय रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थेच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम राबविले जाणार आहेत.असेही त्यांनी सांगितले.दिपप्रज्वलनाने वार्षिक सभेची सुरुवात झाली.
प्रारंभी स्वागत संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉ. प्रो. अशोक बाचूळकर यांनी केले. श्रद्धांजली ठरावाचे वाचन संचालिका प्रा. डॉ. सौ. संजीवनी पाटील यांनी केले. विषय पत्रिकेचे वाचन जनरल मॅनेजर मधुकर खवरे यांनी केले, यावेळी संस्थेच्या प्रवर्तकांचा सत्कार चेअरमन मारुती मोरे यांच्या हस्ते करण्यात आला. तर सेवानिवृत्त सभासद शिक्षक, गुणवंत कर्मचारी व यशवंत विध्यार्थ्यांचा सत्कार सन्मानचिन्ह, शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सभासदांना भेटावस्तूचे वाटप करण्यात आले.
यावेळी सत्कारमूर्ती यांची भाषणे झाली, संचालक व गारगोटी शाखेचे चेअरमन आनंद चव्हाण यांनी शेवटी आभार मानले.या सभेस संस्थेचे संचालक प्राचार्य डॉ. अशोक सादळे, दिनकर पोटे, प्रा. रविंद्र आजगेकर, कृष्णात डेळेकर, युवराज शेटगे, प्रा डॉ तानाजी कावळे, प्रा नेहा पेडणेकर, प्रा.क्रांती शिवणे, प्रशासकीय अधिकारी मारुती कुंभार, यांच्यासह गडहिंग्लज, पाटणे -चंदगड, कोल्हापूर, इचलकरंजी, गारगोटी, सांगली शाखेचे चेअरमन, संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो —
जनता गृह तारण संस्थेच्या २४व्या वार्षिक सभेत बोलतांना चेअरमन मारुती मोरे, बाजूस व्हाईस चेअरमन डॉ. अशोक बाचूळकर, आनंद चव्हाण, डॉ अशोक सादळे आदी