*उपजिल्हा रुग्णालय गारगोटी येथे राष्ट्रीय आयुर्वेद दिवस संपन्न*

उपजिल्हा रुग्णालय गारगोटी येथे राष्ट्रीय आयुर्वेद दिवस संपन्न
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
आज 23सप्टेंबर 2025 रोजी उपजिल्हा रुग्णालय गारगोटी येथे 10 वा राष्ट्रीय आयुर्वेद दिवस साजरा करण्यात आला. वैद्यकीय अधीक्षक डॉ पल्लवी
तारळकर मॅडम यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व धन्वंतरी पूजन झाले. आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले तसेच राष्ट्रीय आयुर्वेद दिवसाचे महत्व, आयुर्वेद लोक आणि ग्रहांसाठी शाश्वत जीवनशास्त्र ही थीम, उच्च रक्तदाब,ह्रदयरोग, मधुमेह, मानसिक आजार, कॅन्सर.. यासारख्या असंसर्गजन्य आजारांमधे आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीचे असलेले महत्व, आयुर्वेद.. आजच्या काळाची गरज याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. सविता शेट्टी यांनी आयुर्वेदिक आहार विहार याविषयी मार्गदर्शन केले. आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीचा सर्वांनी अंगीकार करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. एकूण १४० व्यक्तींनी या व्याख्यानाचा लाभ घेतला. डॉ. मिनाक्षी खराडे यांनी आभार मानले.
या कार्यक्रमासाठी डॉ. वृषाली खोत, डॉ. निखिल मोरे, डॉ. पद्मसिंह पाटील,राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम चे वैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका कुंभार, डॉ. महेश गोनुगडे, डॉ. ऋषीकेश हजारे,तसेच रुग्णालयातीन सर्व स्टाफ, कार्यालयीन सर्व स्टाफ उपस्थित होता.