आपलं आरोग्य आपली जबाबदारी – रो.तानाजीराव पाटील वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात आरोग्य तपासणी शिबिर

आपलं आरोग्य आपली जबाबदारी – रो.तानाजीराव पाटील :
वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात आरोग्य तपासणी शिबिर
सिंहवाणी ब्युरो / तासगाव :
बदलत्या जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी योग्य दिनचर्येचे पालन करणे गरजेचे आहे.आपलं आरोग्य आपली जबाबदारी आहे असे उद्गार रोटरी क्लब तासगावचे अध्यक्ष तानाजीराव पाटील यांनी पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथे आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना काढले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांच्या मार्गदर्शनाखाली रोटरी क्लब तासगाव यांच्या वतीने विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी (हिमोग्लोबिन,ब्लड ग्रुप,वजन व उंची)करण्यात आली. रो.तानाजीराव पाटील पुढे म्हणाले विद्यार्थ्यांना निरोगी आयुष्य जगण्यासाठी सकस संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि तणावमुक्त जीवनशैली अंगीकारणे गरजेचे आहे.तसेच स्क्रीन टाईम कमी करून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना विज्ञान विभाग प्रमुख पी.डी.पाटील सरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच शारीरिक व मानसिक आरोग्याकडेही गांभीर्याने लक्ष द्यावे,असे प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरोग्य विभाग प्रमुख प्रा.डी.व्ही.पाटील यांनी केले. तर आभार प्रा.अरुणा सुतार यांनी मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रसंयोजक व कार्यक्रम अधिकारी प्रा. आण्णासाहेब बागल यांनी केले.आरोग्य तपासणीसाठी डॉ.सुरेश पाटील, डॉ.संचित माने, सौ.वर्षा माने यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाला सेक्रेटरी रो चंद्रकांत खरमाटे ,इव्हेंट चेअरमन रो.रवी साळुंखे, रो.संजय नाईक,रो.राजेंद्र विटेकर,रो. धनराज जाधव, रो.संतोष पेटकर ,रो.सुनील निपाणीकर,रो.साईनाथ घोगरे, रो.आदित्य नाईक यांसह महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.