जिल्हाताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांनी आपली आवड व क्षमता पाहून करिअरचे क्षेत्र निवडावे -डॉ. नितीन कदम

विद्यार्थ्यांनी आपली आवड व क्षमता पाहून करिअरचे क्षेत्र निवडावे –डॉ. नितीन कदम

सिंहवाणी ब्युरो / गारगोटी :
श्री शाहू कुमार भवन गारगोटी येथे भवानी महोत्सवातील पहिले पुष्प गुंफताना डॉ. नितीन कदम म्हणाले की, विज्ञान युगात करिअरचे महत्व मोठे आहे.जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर विद्यार्थ्यांनी आपली आवड व क्षमता निरखून करिअर चे क्षेत्र निवडावे म्हणजे वेळेचा व पैशाचा अपव्यय होणार नाही.करिअरची विविध क्षेत्रे सांगितली. विविध प्रवेश प्रक्रियासाठी असणारे टाइम आणि डिसिजन मेकिंग चे महत्व सांगितले.
मुख्याध्यापक डॉ. एस. बी. शिंदे यांनी प्रास्ताविक केले. एस. टी. निगडे यांनी पाहुण्याची ओळख करून दिली.यावेळी पर्यवेक्षक डी. एल. सावंत,एस. जे.सावंत, यु. बी. जांबळे, डी. वाय. पाटील, विक्रम भोसले,सौ. एस. पी. यादव आदी शिक्षक, पालक मोठया संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सौ. निशा जाधव तर युवराज बिरंबोळे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button