सोलापूर जिल्ह्याला सर्व बाजूंनी पुराच्या पाण्याने वेढले भीमा सिना बोरी भोगावती हरणा नदीला महापूर अनेक गावात शिरले पाणी

सोलापूर जिल्ह्याला सर्व बाजूंनी पुराच्या पाण्याने वेढले
भीमा सिना बोरी भोगावती हरणा नदीला महापूर अनेक गावात शिरले पाणी
सिंहवाणी बुरो / महेश गायकवाड सोलापूर :
सोलापूर जिल्ह्याच्या सर्व बाजूंनी पुराच्या पाण्याने
जिल्ह्याला वेधले असून जिल्ह्यातील सर्व नद्यांना महापूर आला आहे यामुळे सोलापुर जिल्ह्यातील पंढरपूर माढा बार्शी अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर या तालुक्यातील अनेक गावात पाणी घुसले आहे. भिमा सिना बोरी हरणा भोगावती नदीला महापूर आल्या मुळे अनेक गावात घेरे पडली आहेत.
सोलापूर जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा, सीना नदी, तलाव आणि ओढे तुडुंब भरून वाहत असून अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील शेती, पिके व पशुधन यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांना तात्पुरते स्थलांतर करावे लागले आहे.
अक्कलकोट तालुक्यातील भीमा नदी खानापूर अकलगी गुडेवाडी आळगी म्हैसलगी देवीकोटा हिळळी व सीना नदीकाठी कलकर्जोळ कोरशेगाव कुमठा
संकटामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे .भीम व सीना नदीचे इतके भयानक व रौद्ररूप प्रथमच पाहायला मिळत आहे. व सरकारांनी सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी प्रगातशील शेतकरी आणि युवा उद्योजक रविकांत कुरे यांनी केली आहे.
सोलापूर पुणे महामार्गावर सिना नदी ला पूर आला असल्यामुळे पाणीरपुलावरून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
विजापूर सोलापूर हवे बंद झालेला आहे वडकबाळ रस्त्यावर पाणी आले आहे तेरा मैल वरून सोलापूरला जाण्यास रस्ता बंदकरण्यात आला आहे.
माढा तालुक्यात अक्कलकोट तहसील च्या आपदा पथकाच्या मध्यमातून बचाव कार्य सुरु करण्यात आले असून आतापर्यंत 40 लोकांना वाचविण्यात यश आले आहे.
सध्या महाराष्ट्र राज्यासह सोलापूर जिल्ह्यात पावसाने अक्षरशः थैमान घातले असून, काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाने माढा तालुक्यात धुमाकूळ घातला असून, कित्येक गावचा संपर्क तुटला तर कित्येक शेतीचे नुकसान झाले असून, या पावसात सिना कोळेगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सध्या देखील चालू असल्याने धरणातून 65,500 इतक्या क्यूसेक्स चा विसर्ग करण्यात आला आहे. सिना नदीच्या दोन्ही तिरावरील शेतकरी व नागरिक पुरात अडकले असल्याची माहिती जिल्हा प्रसासनाला कळताच त्यांनी तात्काळ अक्कलकोट तहसील कार्यालयाचे आपदा पथकास पाचरण करण्याचे आदेश दिले..
माढा तालुक्यातील रिधोरे गावातील 36 लोकं पुरात अडकल्याची माहिती मिळताचा त्यातील या पथकाने 28 पूरग्रस्तांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असून, 8 जणांना सुरक्षित स्थळी स्थलातरीत केले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर बार्शी पंढरपूर माढा या तालुक्यात तसेच सांगोला आणि सोलापूर जिल्ह्यातील शेजार च्या धाराशिव जिल्ह्यात तेरणा सीना बोरी नदी ला महापूर आला असून सोलापूर जिल्ह्यातील सर्वच नद्यांना महापूर आला असल्यामुळे सोलापूर जिल्हा पाण्याच्या प्रवाहात अडकला आहे.
सोलापूर जिल्ह्याला पाण्याने सर्व बाजूने वेढले आहेर दक्षिण सोलापूर अक्कलकोट बार्शी माढा पंढरपूर या तालुक्यातील सर्व नद्यांना महा पूर आल्यामुळे सोलापूर जिल्ह्यात परिस्थिती नियंत्रण बनली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती गंभीर झाली असल्यामुळे माढा येथे मिलिटरी बोलावण्यात आली आहे
धाराशिव जिल्ह्यात भूम पंढरपूर आणि नळदुर्ग मध्ये परिस्थिती गंभीर झाली आहे अनेक घरे पडली आहेत तर जनावरांचे मोठे हाल झाले असून
लोहारा उमरगा तालुक्यातील अनेक गावातील शेती पिकांचे नुकसान झाले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सहा तालूक्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे
अक्कलकोट तालुक्यातील सर्वच भागांत पूर आला असून येथे बचाव आणि मदतकार्य सुरू आहे
माढा लोकसभा मतदारसंघात भयानक नुकसान झाले असून येथील पूर ग्रस्त लोकांसाठी मदत कार्य सुरू करण्यात आले आहे अशीच परिस्थिती दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहे सोलापूर विजापुर महामार्ग बंद करण्यात आला आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील नदीकाठावरील गावांमध्ये घरादारात पाणी घुसले आहे त्यामुळे घरांची पडझड झाली आहे पंढरपूर तालुक्यातील भिमा नदी मोठे रुद्र रूप घेतली आहे येथे नदीला मोठ्या प्रमाणात महापूर आला आहे
बार्शी तालुक्यातील भोगावती आणि सीना नदी लां महापूर आला आहे यामुळे बार्शी तालुक्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे माढा येथे मिलिटरी बोलावण्यात आले आहे
उत्तर सोलापूर तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार धक्का दिला आहे दोन इसम ओढ्यात वाहून गेले आहेत अक्कलकोट तालुक्यात आता पर्यंत चार जन वाहून गेले आहेत
शेजारच्या धाराशिव जिल्ह्यात उमरगा लोहारा तुळजापूर तालुक्यातील भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. लोहारा तालुक्यातील अचलेर येथे व पंचक्रोशीतील भागात ढग फुटी झाली आहे. घरे दारे पडले आहेत पिके पाण्याखाली गेली आहेत. पिके वाहून गेली आहेत शेतीचे मोठे नुकसान झाले आहे जनावरे मेली आहेत
तर भूम आणि परांडा मध्ये मोठी ढग फुटी झाली आहे यामुळे परांडा येथे मिलिटरी बोलावण्यात आली आहे भूम येथे ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे मोठ्या प्रमाणात पाणी घरा दारात घुसले आहे
शेजारच्या सीमावर्ती भागातील आळंद गुलबर्गा विजापूर इंडी अफजलपूर दुधनी मध्ये हि भिमा नदी ला आलेल्या महापुरामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले असून सगळीकडे संकट ओढवले आहे.