ताज्या घडामोडी

महिलांनी स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानाचा लाभ घ्यावा – विजयालक्ष्मी आबिटकर: स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान :बचतगट महिलांची आरोग्यतपासणी व मार्गदर्शन*

महिलांनी स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानाचा लाभ घ्यावाविजयालक्ष्मी आबिटकर:

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान :बचतगट महिलांची आरोग्यतपासणी व मार्गदर्शन*

सिंहवाणी बुरो / गारगोटी
स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत आज उपजिल्हा रुग्णालय गारगोटीच्या वतीने दत्त मंदिर गारगोटी येथे महिला मेळावा पार पडला.सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री नाम. प्रकाशराव आबिटकर यांच्या सुविद्य पत्नी विजयालक्ष्मी आबिटकर अध्यक्षस्थानी होत्या. कार्यक्रमासाठी मैत्री ग्राम संघ, उमेद प्रभाग संघ, परिस ग्राम संघ गारगोटीच्या ११० महिला उपस्थित होत्या. उपजिल्हा रुग्णालय गारगोटीच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. पल्लवी तारळकर मॅडम, आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल कुलकर्णी, डॉ. सविता शेट्टी यांनी महिलांना तेल व साखर विरहित आहार,निरोगी जीवन शैली व पोषण, शारीरिक व मानसिक आरोग्य याविषयी सखोल माहिती दिली. विजयालक्ष्मी आबिटकर यांनी महिलांशी सुसंवाद साधत त्यांना स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
जिल्हा क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाच्या काजोल देसाई यांनी क्षयरोग आणि
घ्यावयाची काळजी तसेच निक्षय मित्र योजना याविषयी माहिती दिली. यावेळी क्षयरोग माहितीचा Q R कोड scan करण्यात आला. विजयालक्ष्मी ताई निक्षय मित्र झाल्या. त्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना पोषक आहार किट चे वाटप करण्यात आले.
एकूण ११०महिलांची संपूर्ण रक्त तपासणी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन मैत्री ग्राम संघाच्या अध्यक्ष सौ मीना जंगम यांनी केले. कार्यक्रमासाठी उमेद प्रभाग संघाच्या अध्यक्ष सौ. अर्चना पांगिरेकर मॅडम, परिस ग्राम संघाच्या सौ. संजीवनी आबिटकर व सी आर पी ताई कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या.
या कार्यक्रमासाठी RBSK वैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका कुंभार, डॉ. महेश गोनुगडे, डॉ. ऋषीकेश हजारे तसेच RBSk टीम पूनम कोरे, दिपाली हंडे तसेच अनुपमा शिंदे सिस्टर, इनचार्ज सिस्टर स्मिता राऊत विजय कुंभार, एकनाथ पाटील, प्रयोगशाळा तंत्रज्ञ साक्षी पाटील, विद्या यांचे तसेच उपजिल्हा रुग्णालय गारगोटीच्या सर्व स्टाफ चे विशेष सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button