स्वस्थ नारी सशक्त परिवार* अंतर्गत जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालयात उपजिल्हा रुग्णालय गारगोटी तर्फे आरोग्य तपासणी शिबीर

*स्वस्थ नारी सशक्त परिवार*अंतर्गत
जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालयात
उपजिल्हा रुग्णालय गारगोटी तर्फे आरोग्य तपासणी शिबीर
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय गारगोटी तर्फे आज दि. २४ सप्टेंबर रोजी आचार्य जावडेकर
शिक्षणशास्त्र महाविद्यालय गारगोटी येथे आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. डॉ. स्नेहल कुलकर्णी यांनी उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थी,भावी शिक्षक वृंद महिलांना शारीरिक व मानसिक आरोग्य, निरोगी जीवनशैली यावर मार्गदर्शन केले. डॉ. सविता शेट्टी यांनी पोषक आहार व शारीरिक आरोग्य या विषयी मार्गदर्शन केले. प्रयोगशाळा तंत्रज्ञ साक्षी पाटील यांनी सर्व उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थीची रक्ततपासणी केली.
आचार्य जावडेकर शिक्षण शास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी काढलेली रांगोळी, तयार केलेला पत्रिका, सूत्रसंचालन.. एकंदरीत सर्वच कार्यक्रमाचे नियोजन अत्यन्त कल्पक होते.
या कार्यक्रमासाठी आचार्य जावडेकर शिक्षण शास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पी. एस. देसाई मॅडम,प्रा.डॉ. एस. आर. बाड मॅडम, प्रा. डॉ. पी. बी. दराडे ,प्रा.डॉ. आर. के. शेळके शेळके यांचे विशेष सहकार्य लाभले.
या कार्यक्रमासाठी उपजिल्हा रुग्णालय गारगोटीच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. पल्लवी तारळकर मॅडम, वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद कदम ,सर्व रुग्णालयीन व कार्यालयीन स्टाफ या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.