जिल्हाताज्या घडामोडी
सुभाष कुंभार यांच्या वाढदिवसानिमित्त शेणगावमध्ये विविध नागरी सुविधांचा मोफत लाभ

सुभाष कुंभार यांच्या वाढदिवसानिमित्त शेणगावमध्ये विविध नागरी सुविधांचा मोफत लाभ.
सिंहवाणी ब्युरो / योगेश कोळी, शेणगाव
भुदरगड तालुक्यातील शेणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष कुंभार यांच्या वाढदिवसानिमित्त शेणगावमध्ये विविध नागरी सुविधांचा लाभ देण्यात आला, यावेळी शेणगाव कुंभारवाडा परिसरातील सुमारे ५७६ लोकांनी या सुविधांचा लाभ घेतला.यामध्ये पॅनकार्ड अपडेट दुरुस्ती करणे,व नवीन पॅनकार्ड काढणे,लाडकी बहिण योजना लाभार्थी ई-केवायसी, नवीन आधारकार्ड, आधारकार्ड दुरुस्ती, इत्यादी सेवा या एक दिवसीय सामाजिक उपक्रमात मोफत राबविण्यात आल्याबद्दल शेणगाव परिसरातील सर्वच स्तरातून सुभाष कुंभार यांचे आभार मानले जात आहेत.या सेवांचा लाभ सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवा हा या पाठीमागचा उद्देश होता.गेलेअनेक वर्षे सुभाष कुंभार हे सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत,,,