बलशाली भारताचे स्वप्न साकारण्यासाठी युवकाला व्यायामाची आवश्यकता सन्मित्र फिटनेस सेंटर गारगोटीचे उद्घाटन

बलशाली भारताचे स्वप्न साकारण्यासाठी युवकाला व्यायामाची आवश्यकता – ना. चंद्रकांत दादा
सन्मित्र फिटनेस सेंटर गारगोटीचे उद्घाटन
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
बलशाली भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आजच्या युवकाला व्यायामाची आवश्यकता आहे .ही आवश्यकता सन्मित्र सोशल फाउंडेशनच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या सन्मित्र फिटनेस सेंटर निश्चितपणानेच पूर्ण करेल असा विश्वास महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केला .

गारगोटी तालुका भुदरगड येथेसुरू करण्यात आलेल्या सन्मित्र फिटनेस सेंटर व श्री अल्केश कांदळकर संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर हे होते .
यावेळी बोलताना नामदार चंद्रकांत दादा पाटील म्हणाले सन्मित्र सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून अलकेश कांदळकर यांनी सन्मित्र फिटनेस सेंटरची स्थापना केलेली आहे .युवकांचे मनोबल आणि मनोधैर्य वाढवण्यासाठी शारीरिक व्यायामाचे आवश्यकता आहे या शारीरिक व्यायामाची गरज या फिटनेस सेंटरच्या माध्यमातून मागील आणि त्यामुळेच युवकांची मानसिक क्षमता प्रगल्भ होईल यासाठी या फिटनेस सेंटरची झालेली स्थापना परिसरातील युवकांसाठी उपयुक्त ठरेल .
यावेळी बोलताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले सन्मित्र फिटनेस सेंटरच्या माध्यमातून अल्केश कांदळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गारगोटी आणि परिसरात केलेली व्यायाम शाळेची स्थापना ही येथील युवकांना प्रेरणादायी ठरेल परिसरातील युवकांनी या व्यायाम शाळेचा लाभ घेऊन आपली शारीरिकआणि क्षमता वृद्धिंगत करावी .त्यांच्या कार्याला लागेल ती मदत आम्ही करण्यास तयार आहोत .
भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यावेळी बोलताना म्हणाले सन्मित्र सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या पंधरा वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत शालेय मुले महिला वृद्ध यांच्यासाठी या सन्मित्र सोशल फाउंडेशन चे काम गेल्या अनेक वर्ष सुरू असून आत्ता युवकांच्यासाठी अत्याधुनिक व्यायामशाळा उभी करून युवकांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी सन्मित्र ने केलेला हा प्रयोग निश्चितच यशस्वी ठरेल .
प्रारंभी गारगोटी बस स्थानक येथे नामदार चंद्रकांत पाटील यांचे स्वागत कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने केले गारगोटी शहरातून हजारो कार्यकर्त्यांच्या मोटरसायकल रॅलीने नामदार चंद्रकांत दादा पाटील यांचे आगमन कार्यक्रम स्थळी झाले .या मोटरसायकल रॅलीच्या स्वागताने नामदार पाटील भारावून गेले .
यावेळी भुदरगड तालुका संघाचे अध्यक्ष प्रा बाळ देसाई,प्रा राजेंद्र ठाकूर राज्य परिषद सदस्य वसंतराव प्रभावळे तालुकाध्यक्ष संतोष पाटील रणजीत आडके पांडुरंग वायदंडे अमोल पाटील भगवान शिंदे ,गारगोटीचे उपसरपंच राहुल चौगुले प्रताप चौगुले अमोल कल्याणकर ,प्रा धनाजी मोरस्कर,गणपतराव शेटके, पंडीत पाटील,सुनिल तेली ,मोहन सूर्यवंशी, धोंडीराम मांडे, दयानंद कांबळे , विरकुमार पाटील , राम पाटील , चंद्रकांत थवी ,विक्रम पोवार, रमेश रायजादे , सुनिल पाटील , अशोक येलकर, सतिश गायकवाड , सागर पाटील , ‘शशिकांत पाटील , आनंदा रेडेकर , ए. डी. कांबळे , सर्जेराव पाटील , अमित देसाई, नेताजी झांबरे, प्रशांत पुजारी , सौ सुजाता थडके , अवधूत सुतार, रवि पाटील , सचिन हाळवणकर , संतोष बरकाळे , विक्रम सारंग शंकर जठार , प्रकाश कोराणे ,यांचे सह नागरिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक प्रा .शुभांगी किरुळकर यांनी केले .आभार विजय पाटील यांनी मानले तर सूत्रसंचालन सौ अश्विनी पाटील यांनी केले .