सौर पथदिवे ही काळाची गरज -ना. चंद्रकांत दादा पाटील: खा. धनंजय महाडिक यांनी दिला गारगोटी शहरासाठी एक कोटी 25 लाखांचा निधी

सौर पथदिवे ही काळाची गरज -ना. चंद्रकांत दादा पाटील:
खा. धनंजय महाडिक यांनी दिला गारगोटी शहरासाठी एक कोटी 25 लाखांचा निधी
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
सौर पथदिवे ही काळाची गरज असून हीच गरज ओळखून खासदार धनंजय महाडिक यांनी गारगोटी शहरासाठी एक कोटी 25 लाखांचे सौर पथदिवे बसवण्यासाठी निधी दिला असल्याने या सौर पथदिव्यांनी गारगोटी शहर उजळून निघेल असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले .
खासदार धनंजय महाडिक यांच्या निधीतून गारगोटी येथील ज्योतिबा मंदिर परिसरात सौर पथदिव्यांच्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी पालकमंत्री श्री प्रकाश अबिटकर हे होते .
यावेळी बोलताना नामदार पाटील पुढे म्हणाले महायुतीचे सरकार हे सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने काम करत असून या सरकारच्या माध्यमातून समाजातल्या गोरगरीब जनतेची सेवा करण्याचे काम नियमितपणे सुरू आहे याचाच एक भाग म्हणून हे सौर पथदिवे आपण बसवले असून याचा लाभ गारगोटी वासियांनी घ्यावा .
यावेळी बोलताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले भुदरगड तालुक्यामध्ये भाजपा शिवसेना हातात हात घालून कार्यरत असून दोन्ही पक्षांच्या माध्यमातून विकासाची गंगा या तालुक्यात आणून तालुक्याचा कायापालट करू विविध विकास कामांना कोणताही निधी कमी पडू देणार नाही गारगोटी शहराला जिल्ह्याच्या नकाशावर एक उत्तम शहर म्हणून नावलौकिक प्राप्त होईल अशा पद्धतीचे काम करून दाखऊ .
यावेळी ज्योतिबा मंदिर देवस्थान समितीच्या वतीने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री प्रकाश अबिटकर यांचा सत्कार करण्यात आला .तसेच मंत्री चंद्रकांत दादा पाटील व प्रकाश आबिटकर यांचे हस्ते नवरात्र उत्सवात सहभागी झालेल्या भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले .
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, युवा मोर्चा प्रदेश सचिव आलकेश कांदळकर ,गारगोटीचे माजी सरपंच सर्जेराव देसाई , विजय आबिटकर,माजी उपसरपंच अरुण शिंदे ,सागर शिंदे , मधुकर चौगले, प्रताप चौगले,बाजीराव चव्हाण , सदाशिव खेगडे, भिमराव घुंगुरकर, आनंदा चौगले, राजन आबिटकर , गणेश सुतार , अभिजीत सूतार
यांचे सह गारगोटीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
कार्यक्रमाचे स्वागत उपसरपंच राहुल चौगुले यांनी केले तर आभार अभिजित सुतार यांनी मानले