हिंदी कविता लेखन स्पर्धेत स्वराली मुणगेकर प्रथम : परांजपे मोतीवाले हायस्कूलमध्ये राष्ट्रभाषा हिंदी पंधरवडा विविध उपक्रमाने साजरा

हिंदी कविता लेखन स्पर्धेत स्वराली मुणगेकर प्रथम
परांजपे मोतीवाले हायस्कूलमध्ये राष्ट्रभाषा हिंदी पंधरवडा विविध उपक्रमाने साजरा
सिंहवाणी ब्युरो / चिपळूण
येथील श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या परांजपे मोतीवाले हायस्कूलमध्ये राष्ट्रभाषा हिंदी पंधरवडा विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला.
या निमित्ताने विविध उपक्रम घेण्यात आले. इयत्ता आठवी ते दहावी हिंदी कविता लेखन स्पर्धेत इयत्ता दहावी अ मधील कुमारी स्वराली सतीश मुणगेकर हिने प्रथम क्रमांक मिळवला. अस्मी सागर जाडे हिने द्वितीय
तर पूर्वा कृष्णा बडदे आठवी अ हिने तृतीय क्रमांक मिळवला. इयत्ता पाचवी ते सातवी
हिंदी कविता लेखन स्पर्धेत सातवी अ मधील कुमारी विधी दिनेश भोजने हिने प्रथम, सृष्टी गणेश भालेकर हिने द्वितीय तर निधी निलेश गावणंंग हिने तृतीय क्रमांक मिळवला अभ्यासक्रमाच्या पुस्तकातील आवडलेली
हिंदी कविता सुंदर हस्ताक्षरामध्ये लेखन स्पर्धा तसेच हिंदी प्रकट वाचन, हिंदीमध्ये बोलणे, कविता गायन, परिपाठ दरम्यान हिंदी प्रतिज्ञा असे उपक्रम इयत्ता पाचवी ते दहावीच्या वर्गांमध्ये घेण्यात आले. हिंदी विषय प्रमुख श्री रवींद्र गुरव, सौ अनुष्का शिगवण यांनी कविता लेखन स्फर्धेचे परीक्षण केले.
हिंदी विषय प्रमुख श्री
रवींद्र गुरव, सौ प्रज्ञा ठसाळे, अनुष्का शिगवण, पूजा माने आदी हिंदी विषय शिक्षकांनी विविध उपक्रमांतून माहिती देत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
राष्ट्रभाषा हिंदी पंधरवड्या निमित्त आयोजित उपक्रमांना मुख्याध्यापक श्री भाऊ कांबळे, पर्यवेक्षक श्री शिवाजी शिंदे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.