*आगामी निवडणुकाही महायुती म्हणुन लढवणार… ना. चंद्रकांतदादा पाटील* कूर येथे भाजपाचा महाराष्ट्रातील पहिला जिल्हास्तरीय विजय संकल्प मेळावा

*आगामी निवडणुकाही महायुती म्हणुन लढवणार… ना. चंद्रकांतदादा पाटील*
कूर येथे भाजपाचा महाराष्ट्रातील पहिला जिल्हास्तरीय विजय संकल्प मेळावा
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
लोकसभा, विधानसभा निवडणुका महायूती म्हणून एकत्र लढलो त्यामुळे येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही महायुती म्हणुन एकत्रच लढवु आ णि त्या बहूमतांनी जिंकू असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
भुदरगड तालुक्यातील कुर येथील राम मंगल कार्यालय येथे आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद,पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यातील पहिला विजयी संकल्प मेळावा भाजपा जिल्हा कोल्हापूर पश्चिमच्या वतीने संपन्न झाला.त्यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते.
नामदार चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस निवडणूकांच्या आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता असुन पुर्णता ताकदीने भाजपाच्या कार्यकर्त्यांनी झोकुन देवुन काम करावे.प्रत्येकालाच संधी मिळणार नाही याची जाणीव ठेवून पक्षासाठी झटावे.नोव्हेंबर पासुन विकासकामांची उद्घाटने होणार नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी निवडणूकीकरीता वेळ द्यावा.महायुती होताना भाजपच्या कार्यकर्त्यांच्यावर अन्याय होवू देणार नाही. जास्तीत जास्त जागा जिंकून भाजप व मित्रपक्षांची सर्व ठिकाणी सत्ता आणू़
विधानसभेला जर उध्दव ठाकरे नी साथ दिली असती तर राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला शोधावे लागले असते.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील म्हणाले , आम्ही पुर्ण ताकदीने निवडणुकीला सामोरे जाणार आहोत,भाजपाचा विचार कार्यकर्ते घरोघरी पोहोचवतील, नवीन पदाधिकारी, जबाबदारी अतिशय सक्षम पणे काम करणारी माणसे आहेत. भाजप विचार घराघरात पोहचवायचा,कोल्हापूर जिल्हा संघटनात्मक बांधणी झालेली आहे , आगामी जिल्हा परिषद निवडणूकीमध्ये 30 सदस्य निवडून येतील .
यावेळी नुतन भाजपा कोल्हापूर जिल्हा पश्चिम च्या जिल्हा पदाधिकारी यांना नियुक्ती पत्रे व शुभेच्छा नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी अनेक नेते कार्यकर्ते यांचा भाजप पक्षात पक्षप्रवेश झाला.
माजी आमदार संजय बाबा घाटगे, राहुल चिकोडे,संतोष पाटील, संग्राम कुपेकर, अशोक चराटी, देवस्थान चे अध्यक्ष महेश जाधव,केरबा चौगले,अंबरीश सिंह घाटगे,भगवानराव काटे ,हंबीरराव पाटील, पी जी शिंदे ,शिवाजी बुवा अलकेश कांदळकर,संताजी घोरपडे ,वसंतराव प्रभावळे,लहुजी जरग , भिकाजी जाधव ,आनंद गुरव, सुशीला पाटील,महेश चौगुले ,हेमंत कोलेकर ,राजेंद्र तारळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख महेश पाटील,सुधीर कुंभार, परशुराम तावरे, अरुण देसाई,संभाजी आरडे, तानाजी कुरणे,सचिन बल्लाळ ,व्ही टी जाधव , शिवाजी बुवा,विलास बेलेकर,रवींद्र कामत,राजेंद्र ठाकूर, भुदरगड तालुका अध्यक्ष संतोष पाटील , नामदेव चौगुले,रणजीत मुडूकशिवाले ,रवीश पाटील कौलवकर ,पांडुरंग वायदंडे ,अमृत गुरव,भगवान शिंदे ,पंडित पाटील,मोहन सूर्यवंशी,सुनील तेली,रणजीत आडके,अमोल पाटील,अजित सिंह चव्हाण, सुभाष जाधव,धिरज करलकर, नामदेव कांबळे, प्रकाश पाटील, गजानन सुभेदार, अनिल देसाई,संदिप नाथबुवा,शिवाजी सरावणे, कृष्णात आरबुणे, मेघाताई जाधव, रेखा पाटील यांच्या सह प्रमुख जिल्हा नेते, जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, मंडल पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत आनंद गुरव यांनी केले सूत्रसंचालन स्वप्निल सुपल यांनी केले. आभार पांडुरंग वायदंडे यांनी मांनले.
