भूत काल्पनिक गोष्ट : जगात एकही भूत अस्तित्वात नाही – संजय खोचारे :*होन्याळी प्राथमिक शाळेत कोजागिरी साजरी*

भूत काल्पनिक गोष्ट : जगात एकही भूत अस्तित्वात नाही – संजय खोचारे
*होन्याळी प्राथमिक शाळेत कोजागिरी साजरी*
सिंहवाणी ब्युरो / उत्तूर :
भूत ही काल्पनिक गोष्ट असते. जगात एकही भूत अस्तित्वात नाही. माणसाच्या मृत्यू नंतर एकाही व्यक्तीचे भूत होत नाही. असा विश्वास कथाकार श्री.संजय खोचारे यांनी बालकांच्या समोर कथाकथन सत्रात व्यक्त केला. होन्याळी ता.आजरा येथे जि.प.प्राथमिक शाळेत ते बोलत होते.ग्रामीण ,विनोदी शैलीने कथाकार खोचारे यांनी अंधश्रध्दा निर्मुलन विषयावरील भूत या बालकथेचे सादरीकरण केले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक रवींद्र पाटील होते.
कोजागिरी पौर्णिमेनिमित्ताने होन्याळी शाळेत विविध कार्यक्रम झाले. फनी गेम्स, समुहनृत्य , कथाकथन आदी कार्यक्रम झाले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सागर सरोळकर, समीर सुतार,दाजीबा पाटील विनायक पाटील, अश्विनी चांदे, रेश्मा लकांबळे, उज्वला लकांबळे, शितल पाटील, अनिता पाटील, शितल शेंडे , विद्या तेली, सरोजिनी लकांबळे,विजया तेली आदी पालक उपस्थित होते .गजानन मंडळ व भैरीदेव मंडळाचे कार्यकर्ते दिगंबर खाडे, विजय मांडेकर,सुरेश लकांबळे, संतोष चव्हाण , सर्व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या .अध्यापक संदिप लकांबळे, हणमंत सुतार यांनी मनोगते व्यक्त केली.स्वागत व प्रास्ताविक निलिमा पाटील यांनी केले. नितीन पाटील यांनी सुत्रसंचालन केले. निलेश जाधव यांनी आभार मानले.
फोटो-
होन्याळी ता.आजरा येथील प्राथमिक शाळेत कोजागिरी निमित्ताने कथाकथन सादर करताना संजय खोचारे ,मुख्याध्यापक रविंद्र पाटील यांचेसह विद्यार्थी ,महिला पालक.