*आदर्श शिक्षक पुरस्काराने डॉ. डी. टी. खजूरकर व प्रा. प्रमोद शेंडगे सन्मानित”*

*आदर्श शिक्षक पुरस्काराने डॉ. डी. टी. खजूरकर व प्रा. प्रमोद शेंडगे सन्मानित”*
सिंहवाणी ब्युरो / तासगाव :
रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन, दापोली (महाराष्ट्र) यांच्या वतीने दिला जाणारा “आदर्श शिक्षक पुरस्कार” हा प्रतिष्ठेचा सन्मान यंदा डॉ. डी. टी. खजूरकर आणि प्रा. प्रमोद शेंडगे संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय, तासगाव यांना प्राप्त झाला.
शिक्षण क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण कार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेले परिश्रम, तसेच समाजात शिक्षणाचे आणि नैतिक मूल्यांचे संवर्धन या उल्लेखनीय योगदानासाठी हा सन्मान प्रदान करण्यात आला.
या पुरस्कार वितरण सोहळ्यात रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन, दापोलीचे पदाधिकारी, विविध शैक्षणिक संस्थांचे प्राध्यापक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सन्मानित शिक्षकांचा शाल, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र आणि मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एम. पाटील यांनी दोन्ही प्राध्यापकांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ.लक्ष्मी भंडारे डॉ.अर्चना चिखलीकर प्रा.अंकुश पंडित प्रशासकीय सेवक श्री संजय कुंभार श्री.हणमंत वाघमारे सौ.सुजाता हजारे सौ.अस्मिता साळी यांनी या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला.यावेळी बी. एड भाग 1 व 2 मधील सर्व प्रशिक्षणार्थींनी उपस्थित होत्या.
“आदर्श शिक्षक हे समाजाच्या प्रगतीचे प्रेरणास्थान असतात” या भावनेचा प्रत्यय या सन्मानाने पुन्हा एकदा आला आहे.