कर्मवीर हिरे महाविद्यालयात प्रजासत्ताक भारत : कल्पना आणि वास्तव’ या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय परिषद

कर्मवीर हिरे महाविद्यालयात
प्रजासत्ताक भारत : कल्पना आणि वास्तव’ या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय परिषद
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी :
येथील श्री मौनी विद्यापीठाच्या कर्मवीर हिरे कला, शास्त्र, वाणिज्य व शिक्षणशास्त्र महाविद्यालयात उद्या (ता. ११)
राज्यशास्त्र विभागातर्फे एकदिवसीय राष्ट्रीय परिषद होत आहे. ‘प्रजासत्ताक भारत : कल्पना आणि वास्तव’ हा परिषदेचा विषय आहे. शनिवार सकाळी १० वाजता ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात परिषदेला सुरुवात होईल.
मौनी विद्यापीठाचे चेअरमन मधुकरअप्पा देसाई यांच्या हस्ते ‘राज्यघटना प्रस्ताविका अनावरण’ करून
उद्घघाटन होईल.
शिवाजी विद्यापीठाचे राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. रविंद्र भणगे यांचे ‘भारतीय राज्यघटनेची ७५ वर्षे आणि प्रजासत्ताक’ याविषयावर बीजभाषण होईल. संचालक डॉ. पी. बी. पाटील अध्यक्षस्थानी असतील. पहिल्या सत्राचे शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. रणधीर शिंदे प्रमुख वक्ते आहेत. तर दुसऱ्या सत्राचे कोकणी अकादमी गोवाचे अध्यक्ष डॉ. पूर्णानंद च्यारी प्रमुख वक्ते आहेत. तिसऱ्या सत्रात शोधनिबंध सादरीकरण होईल. या परिषदेस सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. उदयकुमार शिंदे, डॉ. शहाजीराव वारके यांनी केले आहे.
