जनता गृहतारण संस्थेकडून मराठवाडा-विदभ पूरग्रस्तांसाठी निधी सुपूर्त

जनता गृहतारण संस्थेकडून मराठवाडा-विदभ पूरग्रस्तांसाठी निधी सुपूर्त
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी :
मराठवाडा-विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून अनेक संस्था संघटना या पूरग्रस्तांना मदत करत आहे, जनता सहकारी गृहतारण संस्थेच्या वतीने पूरग्रस्त निधीसाठी एक लाखाचा धनादेश आज पालकमंत्री ना प्रकाश आबिटकर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. संस्थेचे चेअरमन मारुती मोरे यांनी हा धनादेश दिला.
यावेळी बोलतांना ना. प्रकाश आबिटकर म्हणाले, पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी महाराष्ट्रातील दानशूर व्यक्ती, संस्था संघटनानी उभे राहण्याची गरज आहे, हे ओळखून आपल्या आजरा येथील जनता गृहतारण संस्थेने मदतीचा हात पुढे केला, अनेक संस्थासाठी हा आदर्श आहे, यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉ अशोक बाचूळकर, संस्थेचे संचालक व गारगोटी शाखेचे चेअरमन आनंद चव्हाण, व्हाईस चेअरमन डॉ संजय देसाई, संचालक महादेव मोरूस्कर, सत्यजित चोरगे, प्रशासकीय अधिकारी मारुती कुंभार, व्यवस्थापक दत्तात्रय शिंदे आदी उपस्थित होते.
फोटो —
पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांच्याकडे पूरग्रस्त निधीचा धनादेश सुपूर्त करतांना मारुती मोरे, डॉ अशोक बाचूळकर, आनंद चव्हाण आदी.