जिल्हाताज्या घडामोडी
*प्रा. राजेंद्र तांबेकर यांना पी एच. डी.प्रदान*

*प्रा. राजेंद्र तांबेकर यांना पी एच. डी.प्रदान*
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी :
किसनराव मोरे ज्युनिअर कॉलेज चे प्रा. राजेंद्र तुकाराम तांबेकर कलनाकवाडी (ता. भुदरगड) यांना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर ची शिक्षणशास्त्र विषयातील पीएच. डी पदवी जाहीर झाली.त्यांनी “डेव्हलपमेंट ऑफ मल्टिमीडिया फॉर दि सेलेक्टेड कन्टेन्ट ऑफ फिजिक्स फॉर हायर सेकंडरी लेव्हल स्टुडंट्स” या विषयावर प्रबंध सादर केला. त्यांना शिक्षणशास्त्र विभागप्रमुख डॉ. चेतना सोनकांबळे ,किसनराव मोरे एज्युकेशन सोसायटी ,सरवडे च्या अध्यक्षा श्रीमती मंगलादेवी विजयसिंह मोरे, गोकुळचे संचालक श्री राजेंद्र मोरे, सेक्रेटरी बी. जी. कुदळे, प्राचार्य विक्रमसिंह मोरे , उपप्राचार्य ए.बी.सावंत, प्रर्यवेक्षक ए.डी. पाटील, श्री विजयराव घोलपे,श्री अतिष शिंदे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले