कोणत्याही घटकांवर अन्याय होवू देणार नाही; शिवाजी विद्यापीठाचे नूतन प्र. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी : विद्यापीठ विकास आघाडीचे वतीने सत्कार

कोणत्याही घटकांवर अन्याय होवू देणार नाही; शिवाजी विद्यापीठाचे नूतन प्र. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी
विद्यापीठ विकास आघाडीचे वतीने सत्कार
सिंहवाणी ब्युरो / डॉ. सुनील देसाई, गडहिंग्लज::-
शाहू, फूले, आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन आपण पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठ, संभाजीनगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात कुलगुरु या सह कोल्हापूर येथील शाहू महाराजांच्या नगरीत शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूचा कार्यभार स्वीकारला आहे. प्रशासन, प्राचार्य, शिक्षर्ण संस्था चालक यांच्या माध्यमातून सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील महाविद्यालयातील विद्यार्थी हिताकडे प्राधान्याने लक्ष दिले जाईल . कोणत्याही घटकांवर अन्याय होऊ देणार नाही अशी ग्वाही शिवाजी विद्यापीठाचे नूतन प्रभारी कुलगुरू डॉ सुरेश गोसावी यांनी दिली.
शिवाजी विद्यापीठ विकास आघाडी च्या सिनेट सदस्यांच्या वतीने डॉ गोसावी यांचे स्वागत करण्यात आले. शिवाजी विद्यापीठाचे माजी प्रभारी कुलगुरू डॉ डी. आर. मोरे यांच्या हस्ते नूतन कुलगुरूंचे पुष्प गुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी गडहिंग्लज येथील राजा शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब देसाई कुपेकर, आण्णासाहेब चौगुले, व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ व्ही. एम. पाटील, डॉ आर डी ढमकले, प्राचार्य डॉ. प्राचार्य कणसे, प्राचार्य डॉ. प्रताप पाटील, डॉ संजय जाधव, डॉ. प्रा. सुनील देसाई, विष्णू खाडे, डॉ.प्रा नागेश मासाळ, प्राचार्य सौ वीरकर, डॉ. प्रा. केशव देशमुख, प्रा मानाजी शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना डॉ गोसावी म्हणाले शिवाजी विद्यापीठातील सर्वच घटकांना विश्वासात घेऊन विद्यापीठाचा नावलौकिक उंचावण्यासाठी प्रयत्न केले जातील.
*विद्यापीठ आघाडीचे नेहमीच सहकार्य*
डॉ. डी. आर. मोरे म्हणाले, विद्यापीठ विकास आघाडीच्या रचनेत सर्व पक्षीय घटक आहेत. विद्यार्थी हिताच्या दृष्टीने २००५ पासून विद्यापीठ विकास आघाडीने शिवाजी विद्यापीठाच्या वाटचालीत प्रशासनाला सहकार्य केले आहे. यापुढेही सहकार्य राहील असे स्पष्ट केले.